काय सांगता ! आता पेट्रोल-डिझेलची गरज लागणार नाही, 62 रुपयांत मिळणार ‘हे’ इंधन

MHLive24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य जेरीस आला आहे. अनेक घटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सरकार कोणत्याही प्रकारे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.(Petrol-diesel will no longer be needed)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, सरकार सर्व वाहन उत्पादकांना पुढील सहा-आठ महिन्यांत युरो-सहा उत्सर्जन नियमांनुसार फ्लेक्स-इंधन इंजिन बनवण्यास सांगेल.

फ्लेक्स-इंधन पेट्रोल आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या संयोगातून बनवलेले पर्यायी इंधन आहे. पर्यायी इंधन इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 60-62 रुपये आहे तर देशाच्या बर्‍याच भागात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतीय इथेनॉल वापरुन प्रति लिटर 30 ते 35 रुपयांची बचत होईल.

Advertisement

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल.

Advertisement

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य

पुढील दोन वर्षांत सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल ब्लेंडिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, हे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यात मदत करेल. यापूर्वी, सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य करण्याचे लक्ष्य ठेवले होते, जे आता 2023 केले गेले आहे.

इथेनॉल म्हणजे काय ?

Advertisement

इथॅनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे जो पेट्रोलमध्ये मिसळला जातो आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरला जातो. ऊसापासून इथेनॉल तयार होते. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोल पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन त्वरीत गरम होत नाही.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker