खुशखबर! पेट्रोल ७५ तर डिझेल ६८ रुपये प्रति लीटरवर येऊ शकते; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

MHLive24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- महागाईने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडवले आहे. प्रथम बटाटे, नंतर कांदे आणि आता तेल महागले आहेत. महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे सध्या सामान्य नागरिकाचे हाल होत आहेत. कारण सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती उच्च स्तरावर आहेत. आता जनतेमधून याबाबत नाराजगीचा सूरदेखील निघू लागला आहे. (Petrol can cost Rs 75 and diesel Rs 68 per liter)

आता याच पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुड्स एँन्ड सर्व्हिस टॅक्सवर मंत्र्यांच्या एका पॅनेलनं सिंगल नॅशनल रेटसह पेट्रोलियम उत्पादनावर टॅक्स लावण्याचा विचार करत आहेत. ग्राहक दर आणि सरकारी महसूल यामधील बदल मोठं पाऊल ठरू शकतं असं तज्त्रांना वाटत आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लखनऊ येथे झालेल्या ४५ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. जीएसटी मध्ये कुठलाही बदल करण्यासाठी पॅनेलच्या तीन चर्तुथांश मान्यतेची आवश्यकता भासते.

Advertisement

दरम्यान या मीटिंगदरम्यान, काहींनी इंधन जीएसटी कक्षेत सामावून घेण्याचा विरोध केला. कारण इंधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर आकारणी होते. राज्याला मिळणारा महसूल उत्पन्न केंद्राच्या कक्षेत आणण्याबाबत राज्याच्या प्रतिनिधींचा नकार आहे.

दरम्यान, SBI च्या इकोनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटने त्यांच्या रिपोर्टमध्ये काही महत्वाच्या गोष्टी मांडल्या होत्या. सदर रिपोर्ट यावर्षीच्या मार्च महिन्यात सादर करण्यात आला होता. या रिपोर्टनुसार जर पेट्रोलियम उत्पादन GST च्या कक्षेत आणलं गेले तर केंद्र आणि राज्याच्या महसूलात जीडीपी केवळ ०.४ टक्के म्हणजे १ लाख कोटी रुपये कमी होतील.

जर पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणलं गेले तर देशभरात पेट्रोल ७५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ६८ रुपये प्रति लीटर या दराने विक्री केले जाईल.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker