20 वर्षात पहिल्यांदाच आक्रीत घडलं! पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं

MHLive24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत रोज वाढ आहे. या किमती गगनाला भिडल्या आहेत. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त काही दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 5.15 रुपयांपेक्षाही जास्त दराने महाग झाले आहे, तर डिझेलही जवळपास 5 रुपयांनी वाढले आहे.(Petrol and diesel prices)

कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे पहिल्यांदाच पेट्रोल रु. 120 प्रति लीटरवर आहे.

पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं

Advertisement

यावर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं आहे. मागील वीस वर्षांच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात पेट्रोल दरात इतकी वाढ कधीही झालेली नाही. देशाची राजधानी दिल्लीत 1 जानेवारीला पेट्रोल 83.71 रुपये होतं.

ते आज ऑक्टोबर महिन्यात 107.24 रुपये झालं आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात पेट्रोल 100 रुपयांवर गेलं आहे. केवळ हिमाचलमध्ये पेट्रोल 100 रुपयांहून कमी आहे. तर सर्वाधिक राजस्थानातील श्रीगंगानगरात 119 रुपये झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलची किंमत का वाढते ?

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमागे अनेक कारणे दिली जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे मूल्य इत्यादी कारणे आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे त्यावर लागणारा कर हेदेखील प्रमुख कारण आहे.

कर वजा करायचा झाला तर पेट्रोलची मूळ किंमत अवघी 44 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचीही मूळ किंमत 45 ते 46 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे इंधनाची किंमत जवळपास दुपटीने वाढते.

केंद्र आणि राज्य नक्की कोणता कर लावतात ?

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत इंधनावरील कर आणि शुल्क यांचा मोठा वाटा आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कर आकारतात. याशिवाय, मालवाहतूक, डीलर शुल्क आणि डीलर कमिशन देखील त्याच्या किंमतीत समाविष्ट आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किमतीत हे सर्व जोडल्यानंतर किरकोळ किंमत निश्चित होते.

पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते, जे भारतभर एकसमान आहे. मात्र, व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. देशात राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker