Paneer sold at Rs 78,000 per kg :अबब! ‘येथे’ विकतेय 78 हजार रुपये प्रतिकिलो पनीर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

MHLive24 टीम, 21 सप्टेंबर 2021 :-  भारतात पनीरचा वापर खूप जास्त आहे. हे असे उत्पादन आहे जे आपल्या देशातील सर्व वर्गातील लोकांना आवडते. गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून पनीर बनविले जाते. परंतु गाढवाच्या दुधापासून जगातील सर्वात महागडं असं पनीर तयार केलं जातं.(Paneer sold at Rs 78,000 per kg)

जगातील हे सर्वात महागडं असं पनीर युरोपीय देश सार्बियातील एका फार्म हाऊसमध्ये तयार केलं जातं. या एक किलो पनीरची किंमत तब्बल 78 हजार रुपये इतकी आहे.

अत्यंत दुर्मीळ असं पनीर मानलं जातं कारण याचं उत्पादन खूपच कमी होतं आणि तेसुद्धा गाढवाच्या एका विशिष्ट प्रजातीपासून मिळालेल्या दुधापासून.

Advertisement

किंमत आहे ७८ हजार प्रतिकिलो 

पनीर हे दुधापासून बनविलेले एक अतिशय महत्वाचे उत्पादन आहे. सामान्य पनीर बद्दल चर्चा केली तर भारतात ते तुम्हाला प्रति किलो 300 ते 600 रुपयांपर्यंत मिळते, पण जर तुम्ही या गाढवाच्या दुधाच्या पनीरबद्दल बोलाल तर ते प्रति किलो 78 हजार रुपये विकले जाते.

कुठे बनवतात ‘हे’ पनीर

Advertisement

युरोपियन देश सर्बियातील एका फार्म हाऊसमध्ये गाढवाच्या दुधापासून पनीर तयार केले जाते. हा फार्म जैसाविका म्हणून ओळखला जातो. या शेतावर 200 हून अधिक गाढवे ठेवण्यात आली आहेत.

भारतातील जर्सी गायींमध्ये दिवसाला 30 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे, परंतु गाढवातून 1 लिटर दूध मिळविणे अवघड आहे. हेच कारण आहे की या शेतातल्या सर्व गाढवांकडून मिळणाऱ्या दुधातून फक्त 15 किलो पनीर तयार करता येतो.

असे महाग पनीर सर्व गाढवांच्या दुधापासून तयार करता येत नाही. फक्त बाल्कन प्रजातीची गाढवे असलेल्यांचे दूध सर्वात पौष्टिक मानले जाते. या प्रजातीची गाढवे बहुधा सर्बिया आणि मॉन्टेनेग्रोमध्ये आढळतात.

Advertisement

या आजारांसाठी गुणकारी 

सर्बियाचे पनीर उत्पादक सांगतात की, गाढव आणि आईच्या दुधात समान गुणधर्म असतात. त्यात पुष्कळ पौष्टिक घटक आढळतात. ते दमा आणि ब्राँकायटिसच्या रुग्णांनी सेवन केल्यास त्यांना मोठा फायदा होतो. त्याच वेळी, बर्‍याच लोकांना गायीच्या दुधापासून ऍलर्जी होते.

इतर माहिती 

Advertisement

पनीरचे उत्पादन कमी असल्यानं याची किंमत जास्त आहे. याची खरेदी सर्वाधिक परदेशी किंवा पर्यटकांकडून केली जाते. गाढवाच्या दुधापासून साबण आणि दारुची निर्मितीही केली जाते.

हे पनीर तेव्हा चर्चेत आलं जेव्हा 2012 मध्ये याबाबत बातम्या आल्या होत्या. सार्बियाचा टेनिस स्टार जोकोविचला हे पनीर सप्लाय केलं जातं अशा प्रकारची चर्चा तेव्हा रंगली होती. अर्थात जोकोविचने हे सर्व फेटाळून लावलं होतं.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker