Take a fresh look at your lifestyle.

पवारांच्या बारामतीतून विरोधी पक्ष नेते फडणवीस अतिवृष्टी भागांच्या दौऱ्यास सुरुवात

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :-  मुसळधार पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये शेतातील पिकांचं फार नुकसान झालं आहे.

Advertisement

पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने,

Advertisement

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा करणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधून प्रारंभ होईल. गेल्याचार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा,

Advertisement

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही.

Advertisement

अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Advertisement

असा असणार फडणवीसांचा दौरा बारामतीपासून हा दौरा सुरु होणार असून कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि

Advertisement

सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li