Best Share : जबरदस्त शेअर ! एक लाख गुंतवले , ३८.८५ लाख रिटर्न मिळाले

MHLive24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- सध्या शेअर मार्केट अप-डाऊन होत आहे. ओमोक्रॉनची धास्ती याला करणीभूत ठरत आहे. मार्केट मंगळवारी प्रचंड अस्थिरतेच्या दरम्यान, निफ्टी तेजीच्या ट्रेंडकडे परतला आणि बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला.(Best Share)

परंत या अस्थिरतेच्या काळातही एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये १८ डिसेंबर २०२० रोजी एक पेनी स्टॉक १ रुपया ५ पैशांवर वर बंद झाला. वर्षभरात हा पेनी स्टॉक ४० रुपये ८० पैशांवर जाऊन पोहोचला.

ज्यांनी या पेनी स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते त्यांना वर्षभरात साधारण ३८.८५ लाख रुपयांची कमाई झाली. घसघसशीत कमाई मिळवून देणाऱ्या या शेअर्सचे नाव आहे टीटीआई एंटरप्राइज. या शेअर्सने ३ हजार ७८५ टक्के रिटर्न दिले आहेत.

Advertisement

पेनी स्टॉक म्हणजे काय? पेनी स्टॉकची कोणतीही मानक व्याख्या नाही. परंतु पेनी स्टॉक्स अशा स्टॉक्स म्हणतात ज्याची किंमत खूपच कमी आहे. साधारणपणे १० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या शेअर्सना पेनी स्टॉक म्हणतात.

त्यांचे बाजार भांडवल देखील कमी आहे आणि ते एक्सचेंजेसवर बहुतेक तरल नसलेले असतात. हे बहुतांशी संशोधनाखालील स्टॉक्स असतात आणि बहुतेक गुंतवणूकदारांना त्यांची माहिती नसते.

टीटीआई एंटरप्राइज : या शेअर्सने उत्कृष्ट कामगिरी करत लाखोंचा परतावा दिला. या कालावधीत सेन्सेक्स १८.४३ टक्के वर गेला. या वर्षी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक त्याच्या ५२ आठवड्यांच्या रेकॉर्डमध्ये सर्वोत्तम स्थानावर होता.

Advertisement

टीटीआई एंटरप्राइज (TTI Enterprise) स्टॉक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ५२ रुपये ५ पैशांवर होता. तेव्हापासूनच गुंतवणूकदार स्टॉक विकून प्राॉफिट बुक करत आहेत.

पेनी स्टॉक बद्दल महत्वाचे 

अनेक गुंतवणूकदार पेनी स्टॉक मध्ये पैसे गुंतवतात. कालांतराने अशा कंपन्या वाढतील अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु प्रत्येक कंपनीसाठी हे करणे खूप कठीण आहे. कंपनीचा टर्नअराउंड २ -३ तिमाही निकालांवरून येत नाही.

Advertisement

स्मॉल कॅप कंपनीला सातत्याने चांगले परिणाम द्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही कधी अशी कंपनी निवडली तर अनेक गोष्टींकडे लक्ष द्या. अशा काही स्मॉल कॅप कंपन्या आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि स्मॉल ते ब्लूचिपवर गेले आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker