Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

फडणवीस यांच्या काळात अधिका-यांचा इस्त्राईल दौरा वेगळ्याच कारणांसाठी

0 116

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा इस्राईल दौरा शेती आणि तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेण्यासाठी होता, असे सांगितले होते; परंतु त्यांचा हा दाैरा वेगळ्याच कारणांसाठी होता, हे आता स्पष्ट होत आहे. त्यात पेगॅसस संबंधित माहिती घेण्याचाही समावेश असल्याची शंका काँग्रेसने घेतली आहे.

शेती सोडून दहा अन्य कारणांसाठी दौरा :- हा दौरा शेतीसंबंधित नसून दुसऱ्याच 10 गोष्टींसाठी असल्याचं समोर आलं. यात सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय ते समजून घेणे, वेब मीडिया वापराच्या नव्या मार्गाचा अभ्यास, सायबर गुन्हाबद्दल जागृती कशी करावी, अशा दहा गोष्टींचा समावेश आहे

Advertisement

दौ-यावर काँग्रेसचे प्रश्न :- 2019 चा इस्त्राईल दौरा कशासाठी होता? यावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. काँग्रेसने या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या दौऱ्याबाबत हा खुलासा झाला.

सरकारमधील जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय ते समजून घेणे, वेब मीडिया वापराचे नव्या मार्गाचा अभ्यास, डीजिटल मार्केटिंग टूलच्या वापरासंबंधी माहिती मिळवणे, सरकारसाठी चांगला मीडिया प्लॅन तयार करण्याचं नवं तंत्र आत्मसात करणे, स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्काचा वापर कसा करावा, लोकांना सायबर गुन्हाबद्दल जागृती कशी करावी, पर्यटनात जनसंपर्काचा वापर प्रभावीपणे कसा व्हावा, नवीन माध्यामाचा ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कसा करावा, नवनव्या येणाऱ्या माध्यामांच्या वापरासंदर्भात अभ्यास, आपात्कालीन परिस्थितीत माध्यानमाचा वापर कसा करावा आदी कारणांसाठी हा अभ्यास दाैरा होता, असे सांगण्यात आले.

Advertisement

नेमकं काय घडलं? :- ऑक्टोबरमध्ये विधानसभेसाठी राज्यात मतदान झाले. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या; पण शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने नोव्हेंबरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली.

ही प्रक्रिया सुरू असतानाच माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातील पाच अधिकारी दहा दिवसाच्यां दौऱ्यावर इस्रायलला गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर 20 लाख रुपये खर्च झाला होता.

Advertisement

विशेष म्हणजे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारची परवानगी घेऊन त्यांनी दौऱ्यावर जाणं अपेक्षित होतं; पण हे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता दौऱ्यावर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याचा अहवाल ठाकरे सरकारने मागवला आहे.

दौरा कशासाठी? :- हे अधिकारी शेती विषयाचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण त्यांचा हा दावा सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे फेटाळून लावला आहे. हे अधिकारी सोशल मीडिया आणि सायबर क्राईमचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेले असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.

Advertisement

त्यामुळे हा दौरा कशासाठी होता? या दौऱ्यात काय अभ्यास केला? कुणी ट्रेनिंग दिलं? कुठं ट्रेनिंग दिलं? पेगॅससशी यांचा काय संबंध आहे का? त्याचा सरकारला काय फायदा झाला? आदी गोष्टींची माहिती सरकारने मागवली आहे. त्यामुळे हे अधिकारी अडचणीत आल्याचं सांगण्यात येत आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement