Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

ATM मधून विनामूल्य पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर आता लागणार जास्त चार्ज; आरबीआयने वाढवला ‘इतका’ चार्ज

0

MHLive24 टीम, 11 जून 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल (गुरुवार) एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने कॅश आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांवर मोफत मर्यादेनंतर पैसे काढण्यासाठी असणारे चार्ज वाढविले आहे. ही नवीन प्रणाली पुढील वर्षी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. याअंतर्गत तुम्हाला विनामूल्य मर्यादेनंतर एटीएम व्यवहारासाठी 20 रुपयांऐवजी 21 रुपये शुल्क भरावे लागेल.

रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, असे याकरता केले गेले आहे जेणेकरून जास्त इंटरचेंज फी आणि खर्च वाढीमुळे बँकांना होणाऱ्या नुकसानीमध्ये थोडा दिलासा मिळू शकेल. आरबीआयने म्हटले आहे की बँका एटीएम व्यवहारांवरील शुल्क विनामूल्य मर्यादेनंतर 21 रुपयांपर्यंत वाढवू शकतात.

Advertisement

इतर एटीएमवर विनामूल्य व्यवहार आताप्रमाणेच सुरू राहतील :- तथापि, ग्राहकांना त्यांच्या बँकांकडून प्रत्येक महिन्यात कॅश किंवा नॉन-कॅश ट्रांजेक्शन मिळून दरमहा 5 विनामूल्य ट्रांजेक्शन मिळतील. त्यांना मेट्रो शहरांमधील अन्य बॅंकेच्या एटीएममधून 3 व्यवहार आणि मेट्रो नसलेल्या शहरांमधील अन्य बँकेच्या एटीएममधून 5 व्यवहार विनामूल्य मिळतील.

बँका इंटरचेंज फी देखील वाढवू शकतात :-  इतकेच नाही तर बँका 1 ऑगस्ट 2021 पासून आर्थिक व्यवहारासाठी प्रत्येक व्यवहारावरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत वाढवू शकतात. त्याचबरोबर, नॉन-फाइनेंशियल ट्रांजेक्शनसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

बँका आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम स्थापित करतात. यासह अन्य बँकांच्या ग्राहकांनाही सेवा पुरविल्या जातात. विहित मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास ते शुल्क घेतात ज्याला इंटरचेंज फी म्हणतात. आरबीआयने म्हटले आहे की एटीएम बसविण्यावरील वाढती किंमत आणि एटीएम ऑपरेटरच्या देखभाल खर्चात वाढ पाहता फी वाढवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement