Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आता मुकेश अंबानींचे लक्ष ‘ह्या’ क्षेत्रामध्ये; पुढील दहा वर्षांत होऊ शकतात त्यामधील किंग

0 5

MHLive24 टीम, 23 जून 2021 :- सध्या मुकेश अंबानी ज्याच्यावर हात ठेवत आहेत त्याचे सोने होत आहे. प्रथम दूरसंचार क्षेत्र आणि आता रिटेल सेगमेंट . त्यांचे संपूर्ण लक्ष आता देशातील ग्राहकांची नस पकडून रिटेल व ई-कॉमर्स क्षेत्रावर आपली मक्तेदारी हस्तगत करण्यावर आहे.

अशा परिस्थितीत अमेरिकन इंवेकस्‍टमेंट बॅंकर गोल्डमॅन सैक्‍सच्या अहवालाने अनेक गोष्टी स्पष्ट होतात की येत्या दशकात मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिटेल व ई-कॉमर्स क्षेत्राचेच नाव सर्वत्र असणार आहे.

Advertisement

अहवालानुसार रिटेल व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी मजबूत ग्रोथ इंजिन असल्याचे सिद्ध होणार आहे. पुढील दशकात म्हणजेच 10 वर्षांमध्ये रिलायन्स रिटेलचा नफा 10 पटीने वाढू शकतो. अहवालानुसार रिलायन्सच्या या विभागाचा नफा 2016 ते 2020 पर्यंत 5 पट वाढला आहे, परंतु कोरोनामुळे त्यात स्थिरता दिसून आली आहे.

कोरोना काळात या बाबीला बळकटी मिळाली :- कोरोना युगात रिलायन्सने आपला रिटेल बिजनेस वाढवण्यासाठी डिजिटल क्षमता बळकट करण्याबरोबरच आपली फिजिकल रीच वाढविण्यावर काम केले. अहवालानुसार, सन 2030 पर्यंत भारतात ग्रॉसरी ऑर्गेनाइज्ड रीटेल विक्री 6 पट वाढेल. ज्यामध्ये रिलायन्स रिटेल ची हिस्सेदारी 15% राहू शकते.

Advertisement

त्याचबरोबर, रिलायन्स इंडस्ट्रीजचाकोर रिटेल रेवेन्‍यू येत्या 4 वर्षात 16 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे, जी 44 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. एकूण रीटेल महसुलात ई-कॉमर्सची भागेदारी 35 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.

ऑनलाईन ग्रॉसरी मध्ये 50 टक्क्यांपर्यंत हिस्सा:- गोल्डमॅनच्या अहवालानुसार सन 2025 पर्यंत ऑनलाइन ग्रॉसरी मध्ये रिलायन्सचा हिस्सा 50 टक्के असू शकतो. कंपनी एकूण ई-कॉमर्स मार्केटचा 30 टक्के हिस्सा ताब्यात घेईल.

Advertisement

वित्तीय वर्ष 2025 पर्यंत हे आरआयएलसाठी 35 अब्ज डॉलर्सच्या ई-कॉमर्सच्या एकूण व्यापार मूल्याइतके आहे. ज्यामध्ये 19 अब्ज डॉलर्स ग्रॉसरीचा हिस्सा असू शकतात. म्हणजेच, 2030 पर्यंत, रि‍टेल एबिटा सध्याच्या पातळीपेक्षा 10 पट जास्त असेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement