Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

पैशाच्या वादातून कुख्यात गुंडाचा खून !

0 0

MHLive24 टीम, 6 जून 2021 :-  पैशाच्या देवाण-घेवाणीतून कुख्यात गुन्हेगार जमीर खान शब्बीर खान ऊर्फ जम्या (२५, रा. किराडपुरा) याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोर शुक्रवारी (४ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. जमीरचा साडू शोहेब खानच्या सांगण्यावरूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमीर खान याचा त्याच्या साडूसोबत पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा खटकेही उडायचे. शुक्रवारी जमीर खान शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीच्या शटरजवळ उभा होता.

रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जमीरचा साडू अन्य एकाला घेऊन तेथे आला. त्यांनी जमीरसोबत वाद घातला. त्यांचा वाद टोकाला जाताच साडूसोबतच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोट आणि मांडीवर वार केले. छातीवरील वार वर्मी लागल्याने जमीर जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

Advertisement

शहागंजमध्ये सतत गर्दी असते. ही घटना घडली तेव्हाही तेथे बरेच लोक होते. त्यांनी एका रिक्षातून जमीरला घाटीत हलवले. सिटी चौक पोलिस ठाण्यासमोरून जाताना हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.

त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक मुजगुले यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement