Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

पुढील पाच दिवस पावसाचे

0 261

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :-  हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड , ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी केला आहे.

काय म्हणतो हवामान विभाग ?

आठ जिल्ह्यांमध्ये कोकणातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, पालघर, ठाणे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

22 जुलै रोजी पावसाचा अंदाज काय ?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

23 जुलैचा अंदाज

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ, वाशीम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

Advertisement

24 जुलै रोजी काय स्थिती ?

24 जुलै रोजी राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. त्या दिवशी राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे.

Advertisement

आॅरेंज ॲलर्ट

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement