News for Bitcoin investors : बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार…

MHLive24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- सध्या भारतातील तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीची मोठी क्रेझ आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये ज्या प्रकारचे व्यवहार होत आहेत त्यावरून आपण समजू शकतो की, बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. परंतु आता बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे.(News for Bitcoin investors )

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी लोकसभेत एका उत्तरात सांगितले की, देशात बिटकॉईनला चलन म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही.

सरकार बिटकॉइन व्यवहारांची माहिती गोळा करत नाही, असेही त्यांनी सभागृहात सांगितले. बिटकॉइनला देशात चलन म्हणून मान्यता देण्याचा सरकारचा काही प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर अर्थमंत्री यांनी “नाही” असे उत्तर दिले.

Advertisement

बिटकॉइन काय आहे

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे जे लोकांना वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी बँका, क्रेडिट कार्ड यांचा वापर न करता व्यवहार करण्यास अनुमती देते. हे 2008 मध्ये प्रोग्रामरच्या अज्ञात गटाने क्रिप्टोकरन्सी तसेच इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम म्हणून सादर केले होते. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे ज्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाशिवाय पीअर-टू-पीअर व्यवहार होतात.

सरकारची योजना काय आहे ?

Advertisement

दरम्यान, संसदेच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021 सादर करण्याची सरकारची योजना आहे.

कोणी काय विचारले

खासदार थिरुमावलवन थोल यांनी अर्थ मंत्रालयाला विचारले होते की सरकारला भारतात क्रिप्टोकरन्सीचा व्यापार होत असल्याची माहिती आहे का आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करण्यास भारतात कायदेशीर परवानगी आहे का.

Advertisement

सरकारने भारतात कायदेशीर परवानगी असलेली संस्था म्हणून क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजला परवानगी दिली आहे का, असेही त्यांनी विचारले.

भारतात क्रिप्टोकरन्सी अनियंत्रित

सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकार क्रिप्टोकरन्सी व्यापाराची माहिती गोळा करत नाही. भारतात क्रिप्टोकरन्सी अनियंत्रित आहेत. डिजिटल चलन कोणत्याही बँकेशी किंवा सरकारशी जोडलेले नाही आणि वापरकर्त्यांना अनामिकपणे पैसे खर्च करण्याची परवानगी देतेनाही.

Advertisement

आरबीआयचा प्रस्ताव

“डिजिटल स्वरूपात चलनाचा समावेश करण्यासाठी ‘बँक नोट’ ची व्याख्या विस्तृत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सरकारला ऑक्टोबर, 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झाला आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker