Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

ना जेफ बेजोस, ना बिल गेट्स तर जगातील सर्वात मोठा दानवीर आहे भारतामधील ‘ही’ व्यक्ती; 102 अब्ज डॉलर्स केलेत दान

0 3

MHLive24 टीम, 24 जून 2021 :-  हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनने तयार केलेल्या पहिल्या 50 देणगीदारांच्या यादीमध्ये गेल्या शतकात 102 अब्ज डॉलर्सची देणगी देऊन भारताचे उद्योगपती जमशेदजी टाटा जगातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती बनले आहेत.

मिठापासून तर थेट सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही बनवणारे टाटाचे संस्थापक मदतीच्या बाबतीत बिल गेट्स आणि त्यांची पूर्व पत्नी मेलिंडा यांच्यासारख्या उद्योगपतींच्या पुढे आहेत.

Advertisement

या यादीत वॉरेन बफे (37.4 अब्ज डॉलर्स), जॉर्ज सोरोस (34.8 अब्ज डॉलर्स) आणि जॉन डी रॉकफेलर (26.8 अरब डॉलर) यांचे नावही समाविष्ट आहेत.

हुरुनचे अध्यक्ष आणि आघाडीचे संशोधक रूपर्ट हूगवर्फ यांनी पत्रकारांना सांगितले की “गेल्या शतकात अमेरिकन आणि युरोपियन लोक दान, मदत करण्याच्या बाबतीत पुढे आहेत. परंतु असे असले तरी भारताच्या टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे जगातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती आहेत”

Advertisement

या यादीत विप्रोचे अझीम प्रेमजी हे एकमेव अन्य भारतीय आहेत, त्यांनी परोपकारी कारणासाठी सुमारे 22 अब्ज अमेरिकन डॉलर्सची देणगी दिली आहे. या यादीतील 38 लोक अमेरिकेचे असून ब्रिटनचे 5 आणि चीनचे 3 व्यक्ती आहेत. एकूण टॉप 37 दात्यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यापैकी 13 जिवंत आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement