Take a fresh look at your lifestyle.

वीज वितरणचा निष्काळजीपणा भोवला; ‘त्या’ शेतकऱ्याचा ऊस जळाला

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  वीज तारांमुळे अनेक ठिकाणी ऊस जाळून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या आहेत.

Advertisement

पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती अकोले तालुक्यातील लहित खुर्द शिवारात झाली. अनिल नामदेव गोडसे या शेतकऱ्याचा वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे दीड एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी: लहित खुर्द शिवारात पाईन मळा येथील सर्व्हे नंबर 31/12 मध्ये त्यांचा दीड एकर ऊस आहे. उसाच्या क्षेत्रातून वीज वाहक तारा गेल्या आहेत.

Advertisement

बुधवारी दुपारी 1.30 वाजता शेतात लोंबकळलेल्या अवस्थेत या तारा असल्याने वार्‍याने हेलकावे खात शॉर्ट सर्किट झाल्याने उसाने पेट घेतला.

Advertisement

आगीचे लोट पाहून आसपासचे 20 ते 25 शेतकरी मदतीला धावून आले. आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र आग आटोक्यात आली नाही.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li