Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

दहावी पास असणाऱ्यांसाठी नेव्हीत भरती; 69,100 रुपये पगार , जाणून घ्या सविस्तर

0 605

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- भारतीय नौदलाने नाविकांच्या 350 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 23 जुलै अर्थात आज पर्यंत अर्ज करू शकतात. लेखी परीक्षेच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

पद संख्या – 350

Advertisement

शैक्षणिक पात्रता :- या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी पास असावेत. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

वय मर्यादा :- अर्जदारांचा जन्म 01-04-2001 ते 30-09-2004 दरम्यान असावा. वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

Advertisement

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची सुरुवात – 19 जुलै
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जुलै

सिलेक्शन प्रोसेस :- या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि गुणवत्ता यादीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

Advertisement

पगार :- निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रुपयांपासून ते 69,100 रुपये दरमहा पगार देण्यात येईल.

अर्ज फी :- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

Advertisement

या प्रमाणे अर्ज करा :- इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement