Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मुंबई लोकल सर्वांसाठी बंद जाणून घ्या मुंबईत काय सुरु राहणार ?

0 8

MHLive24 टीम, 6 जून 2021 :-  महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेचा दोन आठवड्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवर आहे. तर, सरासरी ऑक्सिजन बेड ३२ ते ३४ टक्क्यांपर्यंत व्यापलेले आहेत. या आकडेवारीनुसार मुंबई महापालिका लेव्हल ३ मध्ये आहे.

यानुसार मुंबई महापालिकेने अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३० टक्के असल्याने येत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Advertisement

मुंबईमध्ये सोमवारपासून काही निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण मुंबईतील रुग्णसंख्या कमी असली तरी मुंबई लोकल ही पाच जिल्ह्यांमधून धावते. म्हणूनच तूर्तास तरी सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला ब्रेकच असेल.

मुंबईत सध्या लोकलसेवा सुरू असली तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलप्रवासाची मुभा आहे. सर्वसामान्य प्रवाशांना लोकलची दारे बंद करण्यात आलेली आहेत.

Advertisement

राज्य सरकारने अनलॉकसाठी ज्या लेव्हल्स तयार केल्यात आहेत त्यात मुंबईचा समावेश लेवल-३ मध्ये असल्याने मुंबईकरांची लोकलकोंडी कायम राहणार आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने आज एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

अनलॉकबाबतचा आदेश शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारने जारी केला. सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. या आदेशातील लोकलसेवेच्या मुद्द्यावर आज स्पष्टीकरण देण्यात आले. त्यात महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे.

Advertisement

मुंबईत काय सुरु राहणार ! 

 • अत्यावश्यक दुकाने सर्व दिवस सकाळी ७ ते ४ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ सर्व खुले राहतील. तर शनिवारी रविवारी बंद राहतील.
 • माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
 • हाॅटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
 • लोकल रेल्वे बंद राहतील
 • मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा
 • खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
 • शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील
 • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९.
 • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी
 • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत, सोमवार ते शुक्रवार.
 • लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकाना मुभा असेल
 • बांधकाम सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा
 • कृषी सर्व कामाना मुभा
 • ई काॅमर्स सुरु ठेवू शकतो
 • जमावबंदी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यानंतर संचारबंदी

 

Advertisement
 • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
 •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit