मुकेश अंबानींचा धडाका ! आता Just Dial नंतर खरेदी केली ‘ही’ मोठी कंपनी, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा व्यवहार

MHLive24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- इन्फोर्मेशन सर्च अँण्ड लिस्टिंग क्षेत्राती जस्ट डायल या कंपनीवर ताबा मिळवल्यानंतर आता रिलायन्स समूहाने आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. बंगळुरुस्थित Strand Life Sciences ही आयटी कंपनी रिलायन्स समूहातील रिलायन्स बिग व्हेंचर्सकडून विकत घेण्यात आली. ( Mukesh ambani bought a big company )

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस वेंचर्सने स्ट्रँड लाइफ सायन्सेसमध्ये 57.06 टक्के भागभांडवल 393 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. कंपनी मार्च 2023 पर्यंत त्यात आपला हिस्सा आणखी वाढवेल.

यासाठी ती 160 कोटी रुपये खर्च करेल. अशाप्रकारे, रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स यामध्ये एकूण 553 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यानंतर, स्ट्रँड लाइफ सायन्सेसमधील त्याचा हिस्सा 80.3 टक्के होईल.

Advertisement

स्ट्रँड लाईफ सायन्सेस कंपनीची पार्श्वभूमी :- स्ट्रँड लाईफ सायन्सेस या कंपनीची स्थापना 2000 साली झाली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने 88.70 कोटी रुपयांची उलाढाला केली होती. 2019-20 मध्ये हा आकडा 109.84 कोटी आणि 2018-19 मध्ये 96.60 कोटी रुपये इतका होता. गेल्या तीन वर्षात कंपनीचा निव्वळ नफा अनुक्रमे 8.48 कोटी, 25.04 कोटी आणि 21.66 कोटी रुपये इतका होता.

शेअर मार्केटमध्ये रिलायन्सच्या समभागाची उसळी :- भांडवली बाजारात रिलायन्सचा समभाग 2400 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी या समभागाने 4.10 टक्क्यांची उसळी घेतली. आगामी काळात या समभागाचा भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे. सध्या रिलायन्सचे एकूण भांडवली मूल्य 15.40 लाख कोटींच्या घरात आहे.

2.28 कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी :- रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडने स्ट्रँड लाइफ सायन्सेसचे 2.28 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. अशाप्रकारे त्यात त्याचा हिस्सेदारी वाढून 57 टक्के झाला. डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रात रिलायन्सचा प्रवेश वाढताना, कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी झाली आहे.

Advertisement

स्ट्रँड लाइफ सायन्सेसची सुरुवात 2000 मध्ये झाली. ही कंपनी जीनोम टेस्टिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स सॉफ्टवेअरमध्ये व्यवसाय करते. हे दवाखाने, रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे उत्पादक आणि औषध कंपन्यांना देखील आपली सेवा प्रदान करते.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker