Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मराठा आरक्षणावर ‘या’पक्षाचे खासदार मोदींना भेटणार

0 75

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :-  मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेनेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या विकासाच्या मुद्यांकडे ते पंतप्रधानांचे लक्ष वेधणार आहेत.

११ प्रश्नांवर चर्चा :- खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर राऊत यांनी या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदी यांची भेट घेतली होती.

Advertisement

त्या वेळी मांडलेल्या ११ प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांना मोदी यांची भेट हवी आहे. पंतप्रधानांची वेळ मागितली असल्याचं खा. राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी वेळ दिल्यानंतर मागण्या सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

चर्चेचा तपशील :-  खासदारांच्या बैठकीतील चर्चेचा तपशील राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. अनेक प्रश्न विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न आहेत. मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा आदी प्रश्नांकडं पंतप्रधानांचं लक्ष वेधायचं आहे,असं त्यांनी सांगितलं.

Advertisement

या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या 11 मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी स्थगन प्रस्ताव :- खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्वीकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावं, असं आव्हानच त्यांनी रेल्वे राज्यमंत्र रावसाहेब दानवे यांना दिलं. शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला.

Advertisement

दानवे म्हणतात, तर त्यांचा क्लास लावू :- आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोक मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं ते म्हणाले.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement