Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मुंबई विमानतळाचं मुख्यालय हलविणार ? अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण

0 105

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतला. त्यानंतर या विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता त्यावर अदानी ग्रुपनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Advertisement

विमानतळांची मुख्यालयं मुंबईत :- अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (एएएचएल) एएएचएलचे म्हणजे मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा बातम्या ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाल्या होत्या. मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादमध्ये जाईल, अशा अफवांच्या बातम्या प्रसारित झाल्यात.

आम्ही निःसंशयपणे सांगू शकतो की, एमआयएएल आणि एनएमआयएएल दोन्ही विमानतळांची मुख्यालयं मुंबईत राहणार आहेत. आम्ही विमानतळ इकोसिस्टमच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण करण्याच्या आपल्या बांधिलकीवर ठाम असल्याचाही अदानी समूहानं पुनरुच्चार केलाय.

Advertisement

मुंबई विमानतळाचा कारभार अदानी समूहाच्या हाती :- गौतम अदानी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली होती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल.

जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.

Advertisement

चार प्रमुख विमानतळे अदानींकडे :- देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला. यापूर्वी लखनऊ, मंगळूर आणि अहमदाबाद विमानतळाचं नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते. त्यानंतर आता मुंबई हे अदानी समूहाच्या अखत्यारित असलेले चौथे विमानतळ आहे.

यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं बोललं जातं.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit