Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मोदी सरकार पेट्रोल-डिझेलने होणार मालामाल, बजेटपेक्षाही जास्त मिळणार अधिक इतके ‘लाख कोटी’

0 55

MHLive24 टीम, 15 जुलै 2021 :- सध्या पेट्रोल-डिझेलचे दर रोज थोडेथोडे वाढत आहेत. आज एक लिटर पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडला आहे. यामुळे महागाई देखील वाढत चालली आहे.

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या नाकी-नऊ आले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकार पेट्रोल आणि डिझेलवर बरेच कर लावते. त्यामुळे या किमती भरमसाठ वाढत असतात.

Advertisement

सद्य स्थितीला जे कर इंधनावर लागू आहेत त्यामधून जबरदस्त टॅक्स मोदी सरकारला मिळाला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल, डिझेलवरील करांतून मिळालं आहे.

चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये केंद्राला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून ४.६७ लाख कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. सदर रक्कम बजेटच्या अंदाजापेक्षा १.३२ लाख कोटी रुपये अधिक आहेत. चालू आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कातून यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३.३५ लाख कोटी रुपयांच्या महसुली प्राप्तीचा अंदाज आहे.

Advertisement

गेल्या आर्थिक वर्षातही केंद्र सरकारला अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील अबकारी शुल्कातून ९४ ,००० हजार कोटी रुपये अधिक महसूल मिळाला होता. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात राज्यांना व्हॅट म्हणून २.७१ लाख कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. एसबीआय ईकोरॅपच्या नुकत्याच झालेल्या अहवालात असे म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जर आपण पहिले तर पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून सरकारनं तब्बल ५.२५ लाख कोटी रुपये कमावले आहेत. याच कालावधीत प्राप्तिकराच्या माध्यमातून सरकारला ४.६९ लाख कोटी रुपये मिळाले. कंपन्यांनी भरलेल्या कॉर्पोरेट करांतून सरकारला ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

Advertisement

म्हणजेच इंधन करामधून जबरदस्त कमाई सरकारला झाली आहे. पेट्रोल, डिझेलवर सरकारकडून प्रचंड कर आकारला जातो. यात उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर यांच्यासह आणखी अर्धा डझन लहान करांचा, शुल्कांचा आणि सेसचा समावेश होतो. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून सरकारला ५.२५ लाख कोटी रुपये मिळाले.

यामध्ये केंद्र सरकारकडून घेतला जाणारा अबकारी कर आणि राज्यांचं मूल्यवर्धित कर यांचा समावेश आहे. मूल्यवर्धित करांचा आकडा केवळ डिसेंबरपर्यंतचा आहे. मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून मार्च तिमाहीत राज्यांना मिळालेल्या उत्पन्नाचा यात समावेश नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारला इंधनावरील करांमधून सरकारला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

Advertisement

असे ठरवतात पेट्रोल-डिझेलची किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

Advertisement

विक्रेतेही त्यांचे मार्जिन जोडतात :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement