मोदी सरकारच्या ‘ह्या’ योजनेत 5.25 लाख लोकांना मिळेल रोजगार, वाचा अन फायदा घ्या

MHLive24 टीम, 24 जुलै 2021 :-  केंद्रातील मोदी सरकार देशातील रोजगार वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड (पीएलआय) योजना आणली आहे. ही योजना हळूहळू अनेक क्षेत्रात राबविली जात आहे. आता सरकारने स्टील क्षेत्रात या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे.

गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष स्टील क्षेत्रात पीएलआय योजना लागू करण्यास मान्यता दिली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की ही योजना पाच वर्षांसाठी असेल आणि 2023-24 या आर्थिक वर्षापासून लागू होईल.

या योजनेत पाच वर्षांत सरकार स्टील उत्पादक कंपन्यांना 6,322 कोटी रुपये प्रोत्साहन देईल. ते म्हणाले की या योजनेतून सुमारे 5.25 लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. यापैकी सुमारे 68,000 लोकांना थेट रोजगार मिळेल.

Advertisement

4 ते 12% इंसेंटिव दिले जाईल: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की या योजनेंतर्गत सुमारे 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील एकूण पोलाद उत्पादन क्षमता 25 दशलक्ष टनांनी वाढेल. या योजनेंतर्गत उत्पादनांचे लक्ष्य पूर्ण करणार्‍या पात्र कंपन्यांना 4 ते 12% इंसेंटिव दिले जाईल. पाच वर्षांसाठी हे इंसेंटिव दिले जाईल.

200 कोटींपेक्षा जास्त नेटवर्थ असलेल्या कंपन्या यात सहभागी होऊ शकतील: केंद्रीय मंत्री म्हणाले की स्टील क्षेत्रातील 200 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या कंपन्यांना प्रोडक्शन लिंक्ड स्कीम मध्ये समावेश करता येईल. या योजनेंतर्गत कंपन्या कोटेड-प्लेटेड स्टील, उच्च ताकदीचे स्टील, स्पेशॅलिटी रेल, अ‍ॅलोय स्टील उत्पादने, स्टीलचे वायर आणि इलेक्ट्रिकल स्टील तयार करण्यास सक्षम असतील. भारतात नोंदणीकृत आणि स्पेशलिटी स्टीलच्या उत्पादनात गुंतलेल्या कंपन्यांना या योजनेसाठी पात्र मानले जाईल.

काय आहे पीएलआय स्कीम ?: देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी मोदी सरकारने पीएलआय योजना सुरू केली. त्याअंतर्गत सरकारने उत्पादन कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचे इंसेंटिव देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही रक्कम पाच वर्षांमध्ये दिली जाते. आतापर्यंत, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स घटक, वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनाशी संबंधित क्षेत्रांसाठी ही योजना लागू केली गेली आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker