अबब! सर्वसामान्यांना रडवणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमधून अवघ्या चार महिन्यांत मोदी सरकरचा महसूल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला

MHLive24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- चालू आर्थिक वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला असला तरी सरकारला मिळणाऱ्या अबकारी करांपासूनच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ४८ टक्के अधिक अबकारी कर जमा झाला आहे. ( Modi government’s revenue increment )

त्याचे कारण पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जात असलेला विक्रमी दराचा अबकारी कर होय. एकीकडे वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणत आहेत. तर दुसरीकडे याच वाढत्या किमतींमुळे सरकार मालामाल झाले आहे.

केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.

या आर्थिक वर्षामध्ये सरकारने दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढविला आहे. या दोन वेळेला मिळून पेट्रोलवर १३ रुपये प्रतिलीटर तर डिझेलवर १६ रुपये प्रतिलीटर असा अबकारी कर वाढला आहे. सध्या पेट्रोलवर लीटरमागे ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलीटर या दराने अबकारी कराची आकारणी होत आहे.

देशात वस्तू आणि सेवा कर कायदा (GST) लागू झाल्यापासून फक्त पेट्रोल, डिझेल, एटीएफ आणि नैसर्गिक वायू या उत्पादनांवरच अबकारी शुल्क आकारले जाते. अन्य सर्व उत्पादनांचा समावेश जीएसटी अंतर्गत होतो.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker