Good news for farmers : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारकडून आता ‘याचे’ प्लॅनिंग सुरु, होईल फायदा

MHLive24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- मोदी सरकार शेतकऱ्यासांठी विविध योजना राबवत असते. आता सरकारच्या डोक्यात शेतकऱ्यासांठी जरा वेगळेच प्लॅनिंग सुरु आहे. याबाबत शासनाने मंगळवारी सांगितले की, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय देशातील शेतकऱ्यांसाठी युनिक आयडेंटिटी कार्ड (आयडी) बनवण्याच्या प्रक्रियेत आहे.(Good news for farmers )

लोकसभेत पी वेलुसामी आणि के शनमुग सुंदरम यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांसाठी युनिक आयडेंटिटी कार्ड (आयडी) बनवण्याची सरकारची काही प्लॅनिंग आहे का? असा सवाल सदस्यांकडून विचारण्यात आला होता.

Advertisement

या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, “देशातील शेतकऱ्यांसाठी युनिक आयडेंटिटी कार्ड (आयडी) बनवण्याची प्रक्रिया कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून सुरू आहे. शेतकऱ्याचे युनिक ओळखपत्र त्या सर्व कृषी योजनांशी जोडले जाईल, ज्याचा लाभ शेतकऱ्याने घेतला आहे.

या युनिक आयडेंटिटी कार्डचे फायदे स्पष्ट करताना ते म्हणाले की, e-Know Your Farmer (E-KYF) द्वारे शेतकर्‍यांची पडताळणी करण्याची तरतूद आहे ज्यात विविध योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी विविध विभागांना प्रत्यक्ष कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही.

तोमर म्हणाले की यामुळे क्षेत्र-आधारित आणि सानुकूलित सल्ला आदी गोष्टी सुलभ होईल आणि याद्वारे प्रतिकूल हवामानामुळे झालेले पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन करणे सोपे होईल.

Advertisement

एका अहवालानुसार कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव विवेक अग्रवाल यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक युनिक आयडी हा सरकारच्या उपक्रमाचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत विविध योजनांचा डेटाबेस तयार केला जाईल. यामध्ये पीएम किसान योजना आदींसारख्या योजनांचा समावेश असेल.

मंत्रालयातील डिजिटल कृषी विभागाचे तत्कालीन प्रमुख अग्रवाल यांनी तेव्हा वृत्तपत्राला सांगितले होते – आमचा उद्देश एक एकीकृत शेतकरी सेवा इंटरफेस तयार करणे आहे.

युनिक आयडीमुळे त्यांना विविध सरकारी योजना आणि क्रेडिट सुविधांचा अखंडपणे लाभ घेता येईल आणि केंद्र आणि राज्य सरकारांना खरेदी कार्यामध्ये उत्तम नियोजन करण्यात मदत होईल.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker