मोदी सरकार पेट्रोलच्या पर्यायावर तीव्रतेने करतेय तयारी; विशेषतः शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

MHLive24 टीम, 6 जून 2021 :- पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर इथेनॉलचा वापर वाढविण्यावर केंद्र सरकार जोर देत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी सरकारने डेडलाइन कमी केली आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पाच वर्षांनी कमी करून 2025 पर्यंत करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाहीर केले. यापूर्वी हे लक्ष्य 2030 पर्यंत पूर्ण करायचे होते.

Advertisement

पीएम मोदी म्हणाले, इथेनॉलवर लक्ष केंद्रित केल्याने पर्यावरणावर तसेच शेतकऱ्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होत आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ”गेल्या वर्षी सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इंधन ग्रेड इथेनॉल एकत्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

नवीन उद्दिष्टे साध्य करण्याच्या यशासाठी मोदींनी सर्व भागधारकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की 2014 पर्यंत भारतात सरासरी फक्त एक ते दीड टक्के इथेनॉल मिसळले जात होते पण आज ते 8.30 टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी म्हणाले, ” 2013-14 मध्ये देशात 38 कोटी लिटर इथेनॉल खरेदी केले जात होते, ती आता आठपटहून अधिक वाढून सुमारे 320 कोटी लिटर झाली आहे.” गेल्या वर्षी पेट्रोलियम कंपन्यांनी 21000 कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले आणि त्याचा मोठा भाग देशातील शेतकऱ्यांकडून विशेषत: ऊस उत्पादकांकडून घेतला गेला आणि त्याचा त्यांना बराच फायदा झाला.

पीएम मोदी म्हणाले की इथेनॉलवर लक्ष केंद्रित केल्याने पर्यावरणावर तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनावर चांगला परिणाम होत आहे. ते म्हणाले, “21 व्या शतकाच्या भारताला 21 व्या शतकाच्या आधुनिक विचारधारा व आधुनिक धोरणांमधून ऊर्जा मिळेल. या विचारसरणीने आपले सरकार प्रत्येक क्षेत्रात सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit