Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कॉलवर बोलतानाच झाला मोबाईलचा भीषण स्फोट ! एका युवकाचा मृत्यू

0 8

MHLive24 टीम, 4 जून 2021 :-  मोबाईल वर आलेल्या एका कॉलवर बोलतानाच तो फुटल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरुण मोबाईलवर बोलत असताना ही घटना घडली.

या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, फोनवर बोलत असलेल्या युवकाचा मोबाइल फोन अचानक फुटला आणि तो गंभीर जखमी झाला. मानपूर जिल्हा परिसराच्या छापाडौर गावात ही घटना घडली आहे. राम साहिल पाल मृत युवकाचे नाव सांगण्यात आले आहे. मृत युवकाचे वय 28 वर्षे होते.

Advertisement

या स्फोटात घराच्या छताचे मोठे नुकसान झाले असून भिंतींवरही स्फोटाच्या खुना दिसत आहेत. तसेच, मोबाईल चार्ज करत असलेला युवकही या स्फोटात गंभीर जखमी झाला होता.

ही घटना उमरिया जिल्ह्यातील छपरौड गावात घडली. गावातील 28 वर्षीय तरूण राम साहिल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत होता. मोबाईल त्याच्या हातातच होता.त्याला कॉल आला आणि तो बोलू लागला यावेळी अचानकपणे मोबाईल सह पॉवर बँकचा स्फोट झाला आणि घरात धावपळ उडाली.

Advertisement

या स्फोटामुळे घराच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत. याच बरोबर मोबाईल चार्ज करणारा तरूणही घरात जखमी अवस्थेत पडला होता.

घटनेनंतर घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. संबंधित पॉवर बँक आणि मोबाईल नेमके कोणत्या कंपनीची होती, हे अद्याप कळू शकलेले नाही.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement