Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आमदार निलेश लंके म्हणाले राजकारण बाजूला ठेऊन काम…

0 0

MHLive24 टीम, 4 जून 2021 :- कोरोना रुग्णांना धीर देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास त्यांच्या मनातील भीती घालवल्यानंतर या रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे निदर्शनास आल्याचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

तसेच या रुग्णांसाठी औषधोपचारासह योग, प्राणायाम, भजन, कीर्तन इतकेच नव्हे तर तमाशाही मनोरंजनासाठी उपलब्ध करुन दिला. त्यानंतर साडेसात हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले. यात एकही मृत्यू झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या एक हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे ‘आ. निलेश लंके आरोग्य मंदिर’ असे नामकरण व लोकार्पण सोहोळा निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील, सुभाषराव शिंदे, दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, डॉ. वल्लभ कुलकर्णी यांच्यासह विविध गावचे सरपंच व अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

लंके म्हणाले, ‘कोरोनाची मोठी धास्ती लोकांच्या मनामध्ये असल्याने कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला की तो घाबरुन जातो. पॉझिटिव्ह आलो तर काय या भीतीने टेस्ट केली जात नाही. त्यासाठीच कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना औषधोपचारापेक्षा आधार देण्याची,

त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या या महामारीत पक्ष, जातपात न पाहता जीव वाचविणे महत्वाचे असून, आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून काम करणे महत्वाचे आहे.

Advertisement

गेले वर्षभर कोरोना सुरु झाल्यापासून आपण कोराना रुग्णांसाठी काम करीत आहोत. या महामारीत पक्ष राजकारण बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे दुःख समजून घेतले पाहिजे, प्रत्येकाचे अश्रू पुसले पाहिजेत, लोक मदत करतात पण प्रत्यक्षात काम कोण करीत नाही.

कोरोना झाल्यानंतर घरातील लोकही जवळ येत नाहीत. तिथेच रुग्ण अर्धमेला होतो, अशा परिस्थितीत रुग्णाला औषधांपेक्षा आधाराची गरज असते आणि ते काम आम्ही करत असल्याचे सांगत प्रत्येकांने जबाबदारी म्हणून काम न करता कर्तव्य म्हणून काम केले पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे असेही आमदार लंके यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement