आमदार लाड यांचे सेनाभवन फोडण्याचे चिथावणीखोर वक्तव्य

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली, तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढणार आहे. लाड यांच्यासह आ. नीतेश राणे यांनी घणाघाती टीका केली.

सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ :- भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्‌घाटन आमदार राणे आणि लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही.

सेनच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, असा इशारा लाड यांनी शिवसेनेला दिला. शिवसेनेला वाटते, की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य लाड यांनी केलं.

Advertisement

शिवसेनेची ताकद तोडू :- माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान पाच नगरसेवक निवडून आणणार आहोत, असं लाड म्हणाले. किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही ते म्हणाले. शिवसेनेला ताकद देण्याचं काम आम्ही केलं; आता त्यांची ताकद तोडायचं काम आम्ही करू, असा इशारा त्यांनी दिला.

सदा सरवणकर यांचं प्रत्युत्तर :- शिवसेनेची शाखा म्हणजे आम्ही मंदिर मानतो. त्यातून लोकांची सेवा करतो. भाजपनंसुद्दा शाखेच्यामध्यामातून समाज सेवाच करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाही हे लक्षात घ्यावं. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते.

शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणी वाकड करू शकत नाही. सेनेवर आरोप करणारी व्यक्ती वैचारिक दिवाळखोरी असलेली आहे.दादारमधील लोकांना समाजसेवाची गरज आहे युद्धाची नाही. छत्रपतींच्या नावाचा वापर भाजपकडूनही केला गेला आहे. महापालिकेची स्वप्न यांनी बघू नव्हेत, असं आमदार सदा सरवणकर म्हणाले.

Advertisement

राणे म्हणतात, ‘शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर’ :- मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker