Take a fresh look at your lifestyle.

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांची सरकारवर टीका

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोंब मारणे बंद करावे, सरकारचे अपयश झाकण्यासाठीच चौकशीचा फार्स केल्याचा पडळकरांनी आरोप केला आहे.

Advertisement

चौकशीपेक्षा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचा डी.एन.एच भ्रष्टाचाराचा आहे.

Advertisement

आघाडीच्या नेत्यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे बघावे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत असल्याने आघाडीच्या नेत्यांना हे बघवत नाही.

Advertisement

त्यामुळेच चौकशीचा फार्स सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी येथे येऊन बघा मग कळेल की जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा किती चांगला परिणाम झाला आहे. असेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li