Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

Microsoft ने यूजर्ससाठी Emails संदर्भात आणले जबरदस्त फीचर

0

MHLive24 टीम, 11 जून 2021 :-  मायक्रोसॉफ्टने आपल्या आउटलुक मोबाइल अ‍ॅपमध्ये कोरटाना सपोर्ट व्हॉईस फीचर समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या मदतीने वापरकर्ते ईमेल तयार करण्यास, मीटिंग शेड्यूल तयार करण्यात आणि सर्च करणे सोपे जाईल.

वापरकर्ते त्यांच्या आवाजामध्ये मॅसेजेसना प्रत्युत्तर देखील देऊ शकतात आणि नवीन ईमेल तयार करू शकतात. मंगळवारी एका निवेदनात मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की साधारणपणे साप्ताहिक बैठकीत 148 टक्के वाढ झाली असून सरासरी 6 ते 29 मिनिटांचा वेळ लागत आहे.

Advertisement

कंपनीने म्हटले आहे की ऑनलाइन मीटिंग्ज अधिक सुलभ करण्यासाठी शेड्यूलर नवीन मायक्रोसॉफ्ट 365 सेवा घेऊन आला आहे. कंपनी म्हणाली, आपली रिक्वेस्ट कोरटाना ला तशीच सांगू शकता जसे आपण एखाद्या व्यक्तीस ईमेलमध्ये मीटिंग शेड्यूल करण्यास सहायता मागता.

शेड्यूलर ही मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये मानवी सहाय्यासह पहिली आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेवा आहे जी कोरटानाला विशिष्ट कीवर्डशिवाय काम करण्याची परवानगी देते. मायक्रोसॉफ्ट म्हणाले, “ कोरटाना जवळ तीच माहिती पोहोचवायची आहे जी तुम्ही मीटिंग शेड्यूल करताना देता.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup