Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अनेक जण सुचवतात शेळीपालनाचा व्यवसाय; पण या व्यवसायात वापरले जाणारे शास्त्र कोणते? शेळीपालनाचे किती प्रकार असतात? जाणून घ्या इत्यंभूत माहिती

0 29

MHLive24 टीम, 14 जुलै 2021 :-  शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात.

त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.

Advertisement

शेळीपालनाचे तीन पकार 

परंपरागत पद्धत :-  परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही.

Advertisement

अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोषही आहेत. फायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो.

मात्र या पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही.

Advertisement

बंदिस्त शेळीपालन :- शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे.

तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.

Advertisement

अर्धबंदिस्त शेळीपालन :- शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदे

Advertisement
  • बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत.
  • व्यवस्थापन, गोठा बांधणी व देखभाल खर्चात बचत होते.
  • शेळ्यांचा व्यायाम होतो यामुळे आरोग्य चांगले राहते तसेच पाणी जास्त पिले जाते.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे तोटे

  • शेळी फार्म-बकऱ्यांचे दूध मशीननेही काढतात-एक दृश्य.
  • इतर अथवा रोगी शेळ्यांचे संपर्कात आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव.
  • त्यांनी किती खाल्ले याचे मोजमाप करता येत नाही सबब उपसमारीची शक्यता.
    तरीही गोठा आवश्यक असतो.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement