Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मंगलदास बांदलच्या अडचणी वाढल्या ! आता ‘ह्या’ प्रकरणातही गुन्हा झाला दाखल…

0 1

MHLive24 टीम, 3 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी झालेले मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या तीन साथीदारांवर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केलेले असताना आता पुन्हा त्यांच्यासह दोन साथीदारांवर आता फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल केला आहे. एका व्यक्तीच्या परस्पर कागदपत्रे बँकेत देत कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार आहे.

Advertisement

शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्यासह एका अनोळखी इसमावर शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून आर्थिक फसवणूक केली.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. यावेळी शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली होती.

Advertisement

दरम्यान, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना आता जातेगाव बुद्रुक येथील रविंद्र सातपुते या इसमाला शिवाजीराव भोसले बँकेबाबत काहीही माहिती नसताना मंगलदास बांदल, गुलाब पवार व दिनेश कामठे यांनी सातपुते याचे ओळखपत्र व इतर कागदपत्रांचा वापर करून सातपुते यांच्या खोट्या सह्या करून बँकेचे कर्ज काढले.

कर्ज काढल्यानंतर अनेक दिवसांनी सातपुते यांना याबाबत माहिती झाले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने व शिक्रापूर पोलिसांनी कोणाची फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

त्यानंतर रवींद्र सातपुते (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास विठ्ठल बांदल, गुलाब दशरथ पवार (दोघे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) व दिनेश जयसिंग कामठे (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement