Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

HDFC बँकेवर मोठी कारवाई; का? कशासाठी? वाचा सविस्तर..

0 12

MHLive24 टीम, 08 जुलै 2021 :-  देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. मात्र या बँकेवर नॅशनल हाऊसिंग बँके अर्थात NHB कडून कारवाई करण्यात आली आहे. NHB ने HDFC बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4.75 लाख रुपयांचा दंड केला आहे.

कोरोनाकाळात HDFC बँकेकडून मोठ्याप्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले होते. बँकेने कर्ज म्हणून दिलेल्या रक्कमेचा आकडा 30 जूनपर्यंत 11.47 लाख कोटींवर पोहोचला होता. तर बँकेने वाटप केलेल्या होम लोनमध्येही 10.5 टक्क्यांची वाढ झाली होती. तर शेअर बाजारातील कंपनीचे एकूण मूल्य 8.26 लाख कोटी इतके आहे.

Advertisement

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई :- भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup