Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबद्दल मोठी बातमी ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा !

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असल्याचं स्कायमेटचे महेश पुलावत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाची संततधार कायम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे.

Advertisement

महाराष्ट्रात आज आणि उद्या सुद्धा पाऊस होईल. 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

तर, पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Advertisement

विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळणार आहेत. संबंधित जिल्ह्यांत राहत असणाऱ्या नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तसेच आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उद्या देखील राज्यात कमी- अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे ७ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker