Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

महाराष्ट्र हादरला ! पैसे न दिल्याने तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या…

0 9

MHLive24 टीम, 09 जुलै 2021 :-  पैसे दिले नाहीत म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या जिवंत बाळाला खाडीत पुरून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (9 जुलै) सकाळी उघडकीस आली.

प्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार सोनू काळे या दोघांना अटक केली आहे. मात्र या हत्येमागील कारण जेव्हा कळलं तेव्हा एकच खळबळ उडाली.

Advertisement

दोन तृतीयपंथीयांनी दक्षिणा दिली नाही म्हणून अवघ्या तीन महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि त्याचा साथीदार सोनू काळे या दोघांना बेड्या ठोकल्या आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे कि सचिन चितकोटे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कफ परेडच्या आंबेडकरनगर या झोपडपट्टीत राहतात. आई, वडील, पत्नी, भाऊ आणि मुलं असा त्यांचा परिवार. सचिन यांना तीन महिन्यांपूर्वी आर्या ही मुलगी झाली.

Advertisement

त्यामुळे घरात अत्यंत आनंदाचे वातावरण होते. सचिन यांच्या घरात बाळ जन्माला आल्याची माहिती परिसरातील तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले याला समजली. तो सचिन यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचला.

घरात आनंदाचे वातावरण होते. घरात मुलं झाल्याचं कळाल्यानंतर परिसरात राहणारा तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले हा सचिन यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आला.

Advertisement

त्यावेळी त्याने कुटुंबियांकडे एक साडी, नारळ आणि 1100 रुपयांची मागणी केली. माञ लॉकडाऊन असल्यामुळे सध्या घरात पैशांची चणचण असल्याचे सांगत दिवाळीत देऊ असे सांगितले. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने तणतण करत कन्नू हा घराबाहेर पडला.

सध्या पाऊस नाही आणि गरमी वाढलेली आहे. मुलीला गरम होऊ नये म्हणून कुटुंबीय घराचा दरवाजा उघडा ठेवून पडदा ओडून झोपतात. याची माहिती कन्नूला होती.

Advertisement

आणि याच संधीचा फायदा घेऊन मध्यरात्री कन्नूने घरात घुसून आर्यांचं अपरहण केले. विशेष बाब म्हणजे यात त्याचा साथीदार सोनूने त्याला मदत केली. मुलीला उचलून नेल्यानंतर दोघांनी आर्याला कफ परेडच्या खाडीत जिवंत पुरून पळ काढला.

घरात एक मांजर शिरली तिने घरातील एक प्लेट पाडल्यानंतर आल्याची आई ज्योत्स्ना यांना जाग आली. त्यावेळी आर्या शेजारी नव्हती. त्यानंतर कुटुंबियांनी आर्याची शोधा शोध सुरू केली. संशय कन्नूवर असल्याने त्याचाही शोध सुरू केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

पोलिस आणि मुलीचे कुटुंबिय मागावर असल्याचे कळाल्यानंतर कन्नू स्वत:हून कफपरेड पोलिस ठाण्यात हजर राहिली. पोलिस तपासात गुन्ह्यांचा कबूली दिल्यानंतर आरोपींनी सोनूला ही शोधून काढले. पैसे न दिल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याची कबूली कन्नूने पोलिसांना दिली. या दोघांना कफपरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement