LPG Subsidy
LPG Subsidy

MHLive24 टीम, 20 मार्च 2022 :- LPG Subsidy : केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या योजनांमुळे आजघडीला अनेकांच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर पोहोचले आहे. पण अजूनही अशी अनेक स्वयंपाकघरे आहेत जिथे एलपीजी सिलिंडर पोहोचलेले नाहीत. सिलिंडरच्या वाढत्या किमती अनेकांना तोट्याच्या ठरतं आहेत, यामुळे एलपीजी सिलिंडरचे अनेक ग्राहक सरकारी अनुदानावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार गरीब लोकांसाठी अनुदान देते.

भारतातील बहुतेक घरांमध्ये घरगुती इंधन म्हणून एलपीजीचा वापर केला जातो. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून लवकरच एलपीजीच्या किमती वाढू शकतात अशा बातम्या येत आहेत.एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 च्या घरात पोहोचणार असल्याची सतत चर्चा आहे.

दरम्यान सरकारने एलपीजीवरील सबसिडीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की ग्राहक 1,000 रुपयांनाही एलपीजी सिलिंडर घेण्यास तयार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी सिलिंडरबाबत सरकार दोन भूमिका घेऊ शकते. एकतर सरकारने अनुदानाशिवाय सिलिंडर पुरवठा करावा. दुसरे, काही निवडक ग्राहकांनाही अनुदानाचा लाभ दिला जावा.

अनुदानाबाबत सरकारची सध्याची घोषणा काय आहे ?

अनुदान देण्याबाबत सरकारने काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र सरकार यासाठी काहीतरी नियम लागू ठेवू शकते, असा विश्वास आहे.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. उर्वरित लोकांसाठी सबसिडी संपुष्टात येऊ शकते.

सरकार अनुदानावर किती खर्च करते?

2021 च्या आर्थिक वर्षात अनुदानावर सरकारचा खर्च 3,559 रुपये होता, आर्थिक वर्ष 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीपासून ही वाढ होत आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup