Low Price Bike
Low Price Bike

MHLive24 टीम, 30 मार्च 2022 :- Low Price Bike : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उत्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे. भारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक अनेकदा जुन्या गाड्यांमध्ये रस दाखवतात. त्यांच्यासाठी सेकंड हँड बाईक आणि स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमुळे अनेक लोक असा निर्णय घेतात.

तुम्हीही कमी किमतीत बाईक मिळवण्यासाठी प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आहे, ही बातमी तुमच्यासाठी खूपच किफायतशीर ठरणार आहे, जर तुम्हाला बाइक्सची आवड असेल आणि तुम्हाला बाइक घ्यायची असेल, तर तुम्ही ऑफलाइन मार्केटमध्ये जाऊन स्प्लेंडर बाइक ₹ 15,000 मध्ये मिळवू शकता. जर आपण Honda Activa बद्दल बोललो, तर येथे तुम्हाला ₹ 22,000 पर्यंतची सर्वोत्तम Activa मिळू शकते.

तुम्हाला 2016 ची टॉप मॉडेल बाइक फक्त 35,000 रुपयांमध्ये मिळत आहे, तेही Honda Livo ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये ! या बाइक्स केवळ 17 हजार किलोमीटर धावल्या आहेत. दोन्ही बाईकमध्ये डिस्क ब्रेक आहेत. आणि तुम्हाला हे फक्त 35 हजार रुपयांमध्ये मिळत आहे.

2018 मॉडेल ही सेकंड हँड TVS स्पोर्ट्स बाईक आहे. ही बाईक चांगली मायलेज देऊ शकते. ती 12 हजार किलोमीटर धावली आहे.

केवळ 15 हजार किलोमीटर धावणारी बजाज डिस्कव्हर बाइक 22 हजार रुपयांना मिळत आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup