LIC Policy : LIC ची ‘ही’ पॉलिसी महिलांना देते आर्थिक बळ, कमी गुंतवणुकीत मिळतील लाखोंचे फायदे

MHLive24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. याच अनुशंघाने महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी एलआयसीने 2017 मध्ये एक पॉलिसी सुरु केली. तिला ‘आधारशिला पॉलिसी’ असे नाव देण्यात आले.(LIC Policy)

ज्यामध्ये फार कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करायची असेल तर मग LIC ची आधारशिला पॉलिसी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया…

ही योजना फक्त महिलांसाठी आहे – LIC ची आधारशिला पॉलिसी फक्त महिलांसाठी आहे. ज्यामध्ये 8 वर्षे वयापासून ते 55 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करता येते. या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक प्रकारे फायदे मिळतात. उदाहरणार्थ, या पॉलिसीमध्ये, कोणतीही महिला किमान 75 हजार रुपये आणि कमाल 3 लाख रुपयांचा विमा खरेदी करू शकते.

Advertisement

या योजनेअंतर्गत तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षे गुंतवणूक करू शकता.

जर तुम्ही 20 वर्षे दरमहा 899 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 10,959 रुपये जमा कराल. यावर 4.5 टक्के करही भरावा लागेल.

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला लाभ मिळतो – आधारशिला योजना विकत घेतलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, निश्चित रक्कम तिच्या घरातील सदस्यांना दिली जाईल. त्याच वेळी, या योजनेत कोणतीही आयकर सूट उपलब्ध नाही.

Advertisement

तुम्हाला मॅच्युरिटीवर इतका परतावा मिळेल – तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 899 रुपये जमा केल्यास, 20 वर्षांत एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक तुमची होईल. तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी रक्कम एकत्रित करू शकतात.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker