LIC Scheme : LIC ने लाँच केली एक शानदार स्कीम ! एकदाच पैसे जमा करा, आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस

MHLive24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  LIC ही सर्वोत्तम विमा देणारी शासकीय योजना आहे. आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने अर्थात lic ने सरल पेन्शन योजना सुरू केली आहे.(LIC Scheme)

ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम स्कीम आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते.

विमा नियामक IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही Immediate Annuity plan आहे. एलआयसीने या पॉलिसीबद्दल सांगितले आहे की या प्लॅनमध्ये सर्व आयुर्विमाधारकांसाठी समान अटी आणि नियम आहेत.

Advertisement

एलआयसीच्या या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक दोन उपलब्ध वार्षिक पर्यायांपैकी कोणताही एक निवडू शकतो. या योजनेत, पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कर्ज देखील मिळू शकते.

सरल पेन्शन योजनेचा पहिला पर्याय

LIC सरल पेन्शन योजना निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. प्रथम, Life Annuity With 100 return of purchase price. हे पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे, म्हणजेच पेन्शन जोडीदारापैकी एकाशी जोडली जाईल, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर पॉलिसी घेण्यासाठी भरलेला बेस प्रीमियम त्याच्या नॉमिनीला परत केला जाईल.

Advertisement

सरल पेन्शन योजनेचा दुसरा पर्याय

दुसरा पर्याय Joint Life साठी दिला आहे. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही पेन्शनशि जोडले जाते.. यामध्ये जो जोडीदार शेवटपर्यंत जिवंत राहतो, त्याला पेन्शन मिळत राहते.

एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना जितकी पेन्शन मिळते, तितकीच पेन्शनची रक्कम त्यांच्यापैकी एकाच्या मृत्यूनंतरही दुसऱ्या जोडीदाराला आयुष्यभर मिळत राहते. जेव्हा दुसरा निवृत्तीवेतनधारक देखील जग सोडून जातो तेव्हा नॉमिनीला पॉलिसी घेताना दिलेली मूळ किंमत दिली जाते.

Advertisement

हा आहे Immediate Annuity plan

एलआयसीची ही योजना Immediate Annuity plan आहे. म्हणजे पॉलिसी घेताच पेन्शन सुरू होईल. पेन्शनधारकाला दरमहा, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षातून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय आहे. कोणताही पर्याय निवडला तरी पेन्शन त्याच पद्धतीने सुरू होईल.

कसे खरेदी करावे ?

Advertisement

तुम्ही हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. www.licindia.in या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करता येईल.
योजनेतील न्यूनतम एन्युटी रु. 12,000 प्रतिवर्ष आहे. किमान खरेदी किंमत वार्षिक मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असेल.
या प्लॅनमध्ये कोणतीही कमाल खरेदी किंमत मर्यादा नाही.
40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.
मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.
त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker