Investment in RD : FD सोडा आणि RD मध्ये पैसे गुंतवा, ‘येथे’ मिळतेय 8.50 टक्के पर्यंत व्याज

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- आजकाल अनेक लोक गुंतवणूक करत आहेत. कोरोनाने गुंतवणुकीचे महत्व सर्वानाच समजले आहे. यासाठी विविध योजनांचा लाभ लोक घेतात.(Investment in RD)

आवर्ती ठेव अर्थात RD हे एक प्रकारचे ठेव खाते आहे, जे तुम्हाला निश्चित उत्पन्न गुंतवणूक पर्यायांमध्ये नियमित ठेवी ठेवण्यास आणि तुमच्या गुंतवणुकीवर ग्यारंटेड रिटर्न्स देतात.

रिस्क न घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, विशेषत: पगारदारांसाठी, RD हा एक स्थिर गुंतवणूक पर्याय आहे. कारण ते मासिक आधारावर लहान रक्कम जमा करू शकतात. आरडीचा कालावधी 6 महिने ते 10 वर्षांपर्यंत असू शकतो.

Advertisement

त्यावर DICGC कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा सुरक्षा आहे. त्यावर निश्चित व्याज दर देखील आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा 2 संस्थांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला FD पेक्षा जास्त व्याज मिळेल.

किती व्याजदर ?

सध्या बहुतांश मोठ्या बँकांमध्ये एफडीवर 5 ते 6 टक्क्यांहून अधिक व्याज मिळणे कठीण झाले आहे. पण एक कंपनी नागरिकांना आरडीवर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आणखी एक दुसरी बँकही गुंतवणूकदारांना 8 टक्क्यांपर्यंत व्याज देईल.

Advertisement

बचत खाती आणि डेट म्युच्युअल फंडांच्या तुलनेत आरडीमध्ये गुंतवणूक केल्याने जास्त परतावा मिळू शकतो, ज्यामुळे सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय बनतो.

श्रीराम ट्रांसपोर्ट फाइनेंस रेकरिंग डिपॉजिट

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीसह रेकरिंग डिपॉजिट आर्थर आरडी ऑफर करते. यामध्ये मुदतपूर्व पैसे काढणे, ऑटो रिफंड, ऑटो रिन्यूअल, ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा, ऑनलाइन आवर्ती ठेव कॅल्क्युलेटर आणि प्रति हप्ता 500 रुपये किमान ठेव रक्कम आदी सुविधा त्यात आहेत.

Advertisement

पहा व्याजदर

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी १२ महिन्यांच्या आवर्ती ठेवीवर ७.०३ टक्के, २४ महिन्यांवर ७.१२ टक्के, ३६ महिन्यांवर ८.१८ टक्के, ४८ महिन्यांवर ८.३४ टक्के आणि ६० महिन्यांसाठी ८.५० टक्के व्याजदर देत आहे.

परंतु गुंतवणूकदारांनी प्रथम केवळ आकर्षक व्याजदर पाहू नये आणि केवळ अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावी जेणेकरुन डिफॉल्ट झाल्यास व्याज आणि मुद्दल यांबाबत रिस्क कमी होईल. कारण २ वर्षांपूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) डिफॉल्ट झाल्याने गुंतवणूकदारांना खूप त्रास झाला.

Advertisement

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक Rd

ही कंपनी सामान्य नागरिकांना 4.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के व्याजदर 3 महिन्यांसाठी देत आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांसाठी त्याचे व्याज दर 4.50 टक्के आणि 5.00 टक्के आहेत. 9 महिन्यांसाठी 5.50 टक्के आणि 6.00 टक्के, 1 वर्षासाठी 5.50 टक्के आणि 6.00 टक्के, 2 वर्षांसाठी 7.50 टक्के आणि 8.00 टक्के, 3 वर्षांसाठी 7.00 टक्के आणि 7.50 टक्के, 4 वर्षांसाठी 7.00 टक्के आणि 7.75 टक्के , 5 वर्षासाठी 6.50 टक्के आणि 7.00 टक्के आहेत आणि 5 वर्षे ते 10 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी 6.50 टक्के आणि 7.00 टक्के व्याजदर आहेत.

उत्तम गुंतवणूक पर्याय

Advertisement

चांगले व्याजदर आणि DICGC कडून विमा संरक्षण असल्याने नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून आरडीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker