Electric supercar Audi e-tron GT Launch : भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार Audi e-tron GT लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :- जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने आज भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत फोर-डोर कूप्स-ऑडी ईट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ईट्रॉन जीटी या दोन पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या.(Electric supercar Audi e-tron GT Launch)

ऑडी ई-ट्रॉन जीटी पूर्ण पणे नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून ती स्पोर्टीनेस, एक्सक्लूझिविटी आणि आराम प्रदान करते. ऑडी आरएस ई ट्रॉन जीटी कोणत्याही इतर आरएस पेक्षा वेगळी आहे. हे ऑडीचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल सीरीज उत्पादन आहे.

ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ३९० किलोवॅटची पॉवर आहे आणि ती ४.१ सेकंदात ताशी ०-१०० किमीचा सुपरफास्ट वेग धारण करते. तर ४७५ किलोवॅट आरएस ई-ट्रॉन जीटी केवळ ३.३ सेकंदात हा वेग धारण करते.

Advertisement

ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ८३.७/९३. ४ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे. ती ऑडीआरएस ई-ट्रॉन जीटी साठी ४०१-४८१ किमी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी (डब्ल्यूएलटीपी कम्पाइंड) साठी ३८८-५०० किमीची रेंज प्रदान करते.

२७० किलोवॅट डीसी चार्जिंग पॉवर आणि ८०० व्होल्ट तंत्रज्ञानासह नेक्स्ट लेवल हाय पॉवर चार्जिंग, सुमारे २२ मिनिटात ५% ते ८०% पर्यंत चार्ज होते. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई – ट्रॉन जीटी अनुक्रमे १,७९,९०,००० आणि २,०४,९९,००० रुपयांत (एक्स-शोरूम) भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री बलबीर सिंह ढिल्लो म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आम्ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार लाँच करत आहोत.

Advertisement

जुलै २०२१ नंतर हे आमचे चौथे आणि एकूण पाचवे इलेक्ट्रिक वाहन लाँच झाले आहे. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई- ट्रॉन जीटी ऑडीचे अल्टिमेट ब्रँडशेपर आहेत. प्रगती करणाऱ्या प्रीमियम ब्रँडच्या रुपात ऑडीचा निरंतर विकास त्यांच्याद्वारे अभिव्यक्त होतो. हे दोन फोर-डोर कूप डीएनए आणि प्रीमियम मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहेत.”

ऑडी व्हर्चुअल कॉकपिट आणि एमएमआय टच ३१.२४ सेमी (१२.3″) आणि २५.६५ सेमी (१०.१”) च्या डिस्प्लेसह स्टँडर्ड रुपात येतात. ऑडी आरएस ईट्रॉन जीटी वर मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स स्टँडर्डच्या रुपात येते. तर ऑडी ई-ट्रॉन जीटी वर एलईडी हेडलाइट्स स्टँडर्ड आहेत. ऑडी लेजर लाइटसह मॅट्रिक्स एलईडी हेडलँप दोन्ही कारवर एक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

या दोन्ही कार लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम आणि क्रूज कंट्रोलसह येतात तसेच यामध्ये ३६० डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस पॅकेज वैकल्पिक रुपात उपलब्ध आहे. या कार्स पॅनोरमिक ग्लास रुफने सुसज्ज असून कार्बन रुपात अपग्रेड करता येतात. या दोन्ही कार आयबिस व्हाइट, एस्कारी ब्लू, डेटोना ग्रे, फअलोरेट सिल्व्हर, केमोरा ग्रे, माइतोस ब्लॅक, सुजुका ग्रे, टॅक्टिक्स ग्रीन आणि टँगो रेड या नऊ रंगात उपलब्ध आहेत.

Advertisement

ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी ला स्थिरतेसह स्पोर्टीनेस आणि आरामाच्या विशिष्ट ग्रॅन टुरिझ्मो वैशिष्ट्यांना समाविष्ट करूनच तयार करण्यात आले आहे. ‘मोनोपोस्टो’ संकल्पनेपासून प्रेरित होऊन इंटेरिअर ड्रायव्हरवर दृढतेने लक्ष केंद्रित करते. इन्स्ट्रुमेंट पॅनल, यात ऑडी व्हर्चुअल कॉकपिट आहे.

ई-ट्रॉन हब Audi.in वेबसाइट आणि ऑडी कनेक्ट अॅपवर उपलब्ध एक विशेष टॅब आहे. ते तुम्हाला ऑडी ई-ट्रॉनचे अनेक फंक्शन आणि फीचर्ससाठी मार्गदर्शन करते. कार समजून घेण्यासाठी जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी तुमचे मार्गदर्श करण्यापासून ई-ट्रॉन हब असंख्य गोष्टींची मदत करते.

ऑडी ईव्हीचे मालक ऑडी ई-ट्रॉनसह कम्पॅटेबल सर्व चार्जिंग स्टेशनचा रेफरन्स ‘माय ऑडी कनेक्ट’ अॅपवर प्राप्त करू शकतात. इलेक्ट्रिक वाहन टेक्नोलॉजीला वेगाने वापरणे आणि प्रसाराच्या दृष्टीने हे उपकरण ऑडी इंडिया ब्रँडची वेबसाइट आणि अॅपवरही उपलब्ध आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker