‘टीडीएस’ म्हणजे काय? ते केव्हा कट केले जाते ? जाणून घ्या सविस्तर माहिती…

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- TDS म्हणजे Tax Deducted at Source. इथे Source म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आणि Tax Deducted म्हणजे या स्त्रोतामधील कर कपात. उत्पन्नाच्या स्रोतावरच जेव्हा कर कापला जातो तेव्हा त्याला TDS असं म्हणतात. म्हणजे उत्पन्न जिथून मिळणार आहे, तिथेच हा कर एकूण उत्पन्नाच्या रकमेतून कापला जातो आणि उत्पन्नाची उरलेली रक्कम हातात मिळते. ( What is TDS ? )

हा कापला गेलेला कर सरळ सरकार दरबारी जमा होते. याचाच अर्थ उत्पन्न म्हणून जो पैसे देणारा आहे, त्याने करापोटी ठराविक रक्कम कापून घ्यायची आणि मगच उरलेली उत्पन्न रक्कम द्यायची. कापून घेतलेली रक्कम तपशिलासह सरकार कडे कर म्हणून जमा करायची. याला म्हणतात TDS .

TDS कशावर कापतात ? :- एखादा नागरिक वा संस्था यांना उत्पन्न मिळण्याचे काही मार्ग असतात. ते उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असू शकतात.
वेतन
कमिशन
व्यावसायिक मूल्य
ठेवींवरील व्याज
भाडे इ.

Advertisement

टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स (TDS) ? :- टीडीएस तुमच्या उत्पन्नाच्या माध्यमांवर म्हणजेच पगारावर कापला जातो. टीडीएस इनकम टॅक्सचाच एक भाग आहे. ज्याचा भरणा करदात्याने आधीच केलेला असतो. त्याचे सेटलमेंट इनकम टॅक्स रिटर्न मध्ये केले जाते. जर तुमच्या पगारातून कापले गेलेला टीडीएस तुमच्या एकूण देय टॅक्सपेक्षा अधिक असेल तर ITR Filing च्या माध्यमातून परत दिला जातो.

टीडीएस असा प्रकार असतो की, सरकार तुमच्या उत्पन्नाच्या माध्यमातून एकत्रित टॅक्स वसूल करते. टीडीएस तुमचा पगार, गुंतवणूकीवर मिळणारे व्याज, प्रोफेशनल फीस, कमीशन आणि ब्रोकरेजवर देखील कापला जातो.

TDS कोण देत ?:- पेमेंट करणारी व्यक्ती किंवा संस्थेवर टीडीएस भरण्याची जबाबदारी असते. त्यांना डिडक्टर म्हटले जाते. तसेच टॅक्स कापून पेमेंट मिळणाऱ्या व्यक्तीला डिडक्टी म्हटले जाते.टीडीएसमध्ये कापन्यात आलेली रक्कम सरकारी खात्यात जमा करणे गरजेचे असते. डिडक्टरला टीडीएस सर्टफिकेट जारी करून सांगावं लागतं की, त्यांनी किती टीडीएस कापला आहे आणि सरकारकडे जमा केला आहे.

Advertisement

वेतनावर ‘टीडीएस’ :- ‘टीडीएस’शी साधारणतः पहिला संबंध येतो तो नोकरी लागल्यानंतर. तुम्ही नोकरीत रुजू झाल्यानंतर आर्थिक वर्षाच्या प्रारंभी तुमची कंपनी (‘एम्प्लॉयर’) तुम्हाला पुढील आर्थिक वर्षात करू इच्छित असलेल्या गुंतवणुकीचा तपशील विशिष्ट नमुन्यात (‘इन्व्हेस्टमेन्ट डिक्लेरेशन फॉर्म’) सादर करायला सांगते.

या ‘फॉर्म’मध्ये आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’, ’८० डी’अंतर्गत आणि करबचतीसाठी असलेल्या इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करून कमाल कर वजावट (टॅक्स डिडक्शन्स) मिळविण्याची संधी असते. इतके ‘टॅक्स डिडक्शन्स’ घेतल्यानंतरही तुमच्या पगार (‘सॅलरी’) उत्पन्न हे सूट मर्यादेपेक्षा अधिक (अबव्ह टॅक्स एक्झम्पशन लिमिट) राहत असेल तर दरमहा तुमच्या वेतनातून उगमस्थानी करकपात (‘टीडीएस’) केली जाईल.

बँक ठेवींवरील ‘टीडीएस’ :- बँकांमध्ये तुम्ही ठेवलेल्या मुदत ठेवींवर (‘फिक्स्ड डिपॉजिट्स’-‘एफडी’) आणि बचत खात्यांतील रकमेवरीलही वार्षिक व्याज दहा हजार रुपयांच्या वर गेले तर तुमची बँक त्यावरील ‘टीडीएस’ कापून घेऊनच तुम्हाला मुद्दल व व्याजाच्या परताव्याची रक्कम देते. जे मोठमोठया रकमांच्या ठेवी ठेवू शकतात असे काही हुशार धनिक ‘टीडीएस’ चुकविण्यासाठी आपल्या ठेवी वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि शाखांमध्ये विभागून ठेवतात.

Advertisement

पण आता बँकांमधील ‘टीडीएस प्रोसेस’चे केंद्रीकरण (‘सेन्ट्रलाइज्ड’) करण्यात आलेले असून, बँक ठेवीदारांच्या ‘पर्मनन्ट अकाउन्ट नंबर’च्या (‘पॅन’) आधारे प्रत्येकाला एकच ‘युनिफॉर्म आयडी’ दिला जातो. त्याच्या आधारे बँका कोणत्या ठेवीदाराला एकूण किती व्याज उत्पन्न मिळाले आहे व ते करपात्र मर्यादेत आहे की नाही याची माहिती संकलित करू शकतात व त्याप्रमाणे उगमस्थानी करकपात करू शकतात. शिवाय आयकर विभागाचे करचुकव्या धनिकांवर लक्ष असतेच.

घरभाडे, घरविक्री उत्पन्नावर :- तुम्हाला घरभाडे उत्पन्न मिळत असेल तर त्यावरही ‘टीडीएस’ लागू होऊ शकतो. पण घरभाड्याची वर्षभरातील रक्कम १ लाख ८० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर ‘टीडीएस’ लागू होणार नाही. घरभाडे उत्पन्न त्याहून अधिक असेल तर दहा टक्के दराने ‘टीडीएस’ लागू होईल.

मात्र भाडेकरूकडून घरमालकाने घेतलेल्या अग्रिम ठेवीवर (‘अॅडव्हान्स डिपॉजिट’) ‘टीडीएस’ लागू होत नाही. तुम्ही ग्रामीण भागातील तुमचे घर विकले आणि त्याची किंमत २० लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर १ टक्के दराने ‘टीडीएस’ लागू होईल. शहरी भागातील घर विकले आणि किंमत ५० लाख रु.पेक्षा अधिक असेल तर असाच ‘टीडीएस’ लागेल.

Advertisement

सोनेचांदी खरेदीवर :- काळ्या (बेहिशेबी, कर चुकवून मिळविलेल्या) पैशाच्या उलढालींना आळा घालण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०११-१२ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे सोन्याच्या किंवा चांदीच्या खरेदीसाठी जेथे दोन लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम (‘कॅश’) वापरली जात असेल त्या व्यवहारावर विकणारा हा खरेदीदाराकडून १ टक्का कर वसूल करील. जुलै २०१२ पासून सोनेचांदी खरेदीवर हा कर लागू झाला आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker