राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी जाणून घ्या तुमच्या जिल्हातील स्थिती

MHLive24 टीम, 4 जून 2021 :- मान्सून केरळमध्ये होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी प्रामुख्याने, पश्चिम महाराष्ट्रासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

पुढचे दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Advertisement

तर सांगलीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. मिरजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीही साचले होते. मराठवाड्यातही काही भागांत पाऊस झाला. मात्र मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते.

पुण्यामद्ये प्रामुख्यानं नीरा नदी आणि वीर धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी जोरदार पावसासह वादळी वारेही पाहायला मिळाले. मुंबईत बुधवारी काही भागांमध्ये झालेल्या चांगल्या पावसानंतर गुरुवारी मात्र तुरळक भागांत पाऊस झाला.

Advertisement

शुक्रवारीही पुणे आणि मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी मध्यम आणि तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

पूर्व मोसमी पावसानं मुंबई आणि लातूरमध्येही हजेरी लावली. मुंबई ढगाळ आकाश दिसत असून, ठाणे तसेच रायगड वर पण ढग सध्या दिसत आहेत.

Advertisement

पुणे सातारा अहमदनगर अंशतः ढगाळ असून विदर्भ|वरती बऱ्याच ठिकाणी आकाश पूर्णतः ढगाळ आहे. काल मुंबई मध्ये उपनगरात संध्याकाळी माध्यम ते जोरदार पाऊस पडला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement