Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

शाहरूख खानची भेट घडविण्याच्या आमिषानं अपहरण !

0 89

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :-  चित्रपट तारे-तारकांना भेटण्याची इच्छा असते. मुली तर अभिनेत्यांना भेटण्यासाठी काहीही करायला तयार होतात. दादरमध्ये एका अल्पवयीन मुलीला बाॅलिवूड किंग शाहरूख खानची भेट घडवून आणण्याचं आमिष दाखवून तिचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या.

शिताफीने सुटका

Advertisement

दादर जीआरपीने मोठ्या शिताफीने पीडितेला आरोपीच्या तावडीतून सुखरुप सोडवले. संबंधित आरोपीचं नाव सुभान शेख असं आहे. त्याने फेसबुकवर पीडित तरुणीसोबत ओळख निर्माण केली होती.

नेमकं प्रकरण काय?

Advertisement

दादर जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभान शेख आणि पीडित मुलगी यांची ओळख एक वर्षाआधी फेसबुकवर झाली होती. आरोपीने फेसबुक अकाउंटवर 20 वर्षीय तरुणाचे फोटो लावले होते. त्याचबरोबर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले होते.

ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दोघांनी फेसबुकवर चॅटिंग करायला सुरुवात केली. यातून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आरोपीने स्वत:ला इव्हेंट मॅनेजर असल्याचे सांगितले होते. यादरम्यान आरोपीने मुलीला शाहरुख खान सोबत भेटणार का? असं विचारले. त्यावर मुलीने होकार दिला.

Advertisement

कोलकात्याहून मुलगी मुंबईला

पीडित मुलगी ही आपल्या परिवारासोबत कोलकाताहून दीडशे किलोमीटर लांब पळशीपरामध्ये राहते. आरोपी सुभान शेख हा मुंबईच्या मिरा रोड येथे राहतो. मुलगी 15 जुलैला जेव्हा घरी आली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबींयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली.

Advertisement

पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला. या वेळी ही मुलगी मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दादर जीपीआरपीला संपर्क साधला. त्यानंतर दादर स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी तातडीने कोलकाताहून आलेल्या रेल्वे बघण्यास सुरुवात केली. या दरम्यान दादर जीआरपीला मुंबई हावडा ट्रेनमधून उतरलेल्या पीडितेला शोधण्यात यश आलं.

कशी केली मुलीची सुटका ?

Advertisement

आरोपीने मुलीला फेसबुकवर मेसेज केला होता, की तो कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तो आपल्या वडिलांना रेल्वे स्टेशनवर घेण्यासाठी पाठवत आहे. त्यानंतर आरोपी तिला घेण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. आरोपीने मुलीला भेटल्यानंतर तिच्या मोबाईलचं सीमकार्ड तोडलं; पण रेल्वे पोलिसांनी आरोपीला बरोबर हेरलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सुखरुप सोडवलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement