Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कंगनाची पुन्हा उच्च न्यायालयात धाव

0 260

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी बाॅलिवूॉड तारका कंगाना राणावत हिच्याविरोधात बदनामी केल्याचा दावा दाखल केला असून, न्यायालयाने त्याची सुनावणीही सुरू केली आहे.

फाैजदारी कारवाई सुरू झाल्याने आता कंगनाने अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आपल्याविरुद्ध सुरू केलेली फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कार्यवाही रद्द करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Advertisement

दिंडोशी न्यायालयाचा कंगनाला दणका :- न्यायदंडाधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदीचे पालनच केलेले नसल्याने ही कार्यवाही बेकायदा आहे, असा दावा करत कंगनाने केलेला अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे कंगनाने आता उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

संपूर्ण कायदेशीर कार्यवाही बेकायदा असल्याने ती रद्द करावी किंवा आपल्या या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. कंगनाने अॅड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत हा अर्ज सादर केला.

Advertisement

कंगनाचे आक्षेप :- न्यायदंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी जुहू पोलिसांना दिलेले चौकशीचे आदेश, पोलिसांनी नोंदवलेले जबाब या संपूर्ण प्रक्रियेवरही कंगनाने आपले आक्षेप अर्जात नोंदवले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण ? :- जावेद अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावले आणि ऋतिक रोशन प्रकरणात माफी मागण्याचा सल्ला दिला. हे सांगताना ते वरच्या आवाजात बोलत होते. त्यामुळे मी घाबरले होते, अशा प्रकारचे विधान कंगना राणावत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

Advertisement

तिची बहीण रंगोली हिनेही त्यास दुजोरा दिला होता. याबाबत सोशल मीडियातही पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. कंगनाचा हा आरोप फेटाळत जावेद अख्तर यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

कंगनाने केलेला आरोप तथ्यहीन असून यातून माझी नाहक बदनामी झाली आहे, असे नमूद करत जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्याआधारे कंगनाला जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते; मात्र कंगनाने न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला होता.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement