Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अनिल देशमुख यांच्या याचिकेवर गुरूवारी निर्णय

0 136

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :-  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल मनी लाँडरिंगचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दीड महिना सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आता गुरूवारी याबाबत निकाल लागणार आहे. देशमुख यांना दिलासा मिळतो, की त्यांना कारवाईला सामोरे जावे लागते, हे त्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

राज्य सरकारचीही याचिका

मनी लॉड्रिंग प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Advertisement

तसंच या गुन्ह्यातील दोन कलम रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडूनही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखीव ठेवला आहे. त्याचा निकाल गुरुवारी देण्यात येईल अशी शक्यता आहे.

साडेतीनशे नव्हे, चार कोटीची संपत्ती जप्त

मनी लॉर्डिंग प्रकरणात देशमुख यांची मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून चार कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं; मात्र या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे आजची किंमत साडेतीनशे कोटींच्या वर असल्याचं सांगितलं जातं. याबाबत स्वत: देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं. आपली तीनशे कोटींची नाही, तर फक्त चार कोटीची संपत्ती ईडीने तात्तपुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले.

Advertisement

‘सर्वोच्च’ निकालानंतर ईडीसमोर जाणार

ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये दोन कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे; पण काही वर्तमानपत्रात जमीन तीनशे कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलं.

मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल, त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं त्यांनी म्हटलं.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit