Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

चौथी पास असणाऱ्यांना पुणे महापालिकेत नोकरीची संधी; वाचा सविस्तर…

0 2

MHLive24 टीम, 11 जुलै 2021 :- कोरोनाच्या संकटाने अनेक लोक जॉब लेस झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला.

आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पिडलेल्या आणि नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. आपणही जर नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.

Advertisement

चौथी पास असलेल्या उमेदवारांची भरती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ही भरती सफाईसेवक या पदासाठी होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 असणार आहे.

Advertisement
  • सफाई सेवक – एकूण जागा 25
  • शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
  • निवड प्रक्रिया – पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत त्यानुसार पात्रतेनुसार मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
  • वेतन – 17,205/- रुपये प्रतिमहिना
  • अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा ?– कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -05
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2021

 

😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news

Advertisement
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement