Mhlive24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून घर करून बसलेले जगभर कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली.
अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारीच्या वाढ झाल्याने लोकांचे आर्थिक स्थैर्य खालावले. यातून सावरण्यासाठी अनेकांनी मिळेल ते काम धंदा करण्यास सुरुवात केली आहे. याचेच एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
ऑलिम्पिकमध्ये सुर्वणपदकासह विक्रमी कामगिरी करणाऱ्या एका तलवारबाजी खेळाडूला पोटापाण्यासाठी सायकलवरून घरोघरी जाऊन खाद्यपदार्थ देणाऱ्या डिलिव्हरी बॉयची नोकरी करण्याची वेळ आली आहे.
व्हेनेझुएलातील 35 वर्षांचा रुबेन लिमार्दो याने सोशल मीडियावर याबाबत एक फोटो शेअर केला आहे. रुबेन याने आठवर्षांपूर्वी झालेल्या लंडन ऑलिंपिकमध्ये तलवारबाजी या खेळात सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
तो आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठीही तयारी करत आहे. पण गेल्या आठवड्यात त्याने ट्विट करून पोलंडमध्ये तो सायकलवरून डिलिव्हरीला जात असल्याचा फोटो टाकला. त्यानी लिहिलं, ‘ प्रत्येकाला आपापलं ध्येय गाठायचंय आणि इतरांसारखी ही नोकरीच आहे.
‘ तो उबर इट्सच्या एक दिवसाच्या विशेष प्रशिक्षणाला गेला होता असं त्यानी सांगितलं. सध्या कोरोनामुळे कुठल्या स्पर्धा सुरू नाहीत त्यामुळे लिमार्दो आणि तर तलवारबाजांना पैसे मिळण्याचं साधन उपलब्ध नाही.
त्यामुळे रुबेन लिमार्दो डिलिव्हरी बॉयचं काम करत आहेत. टोकियो ऑलिम्पिक या वर्षी होणार होतं ते पुढं गेलं आहे त्यामुळे स्पॉन्सरनेही पुढच्या वर्षीपासून पैसे देणार असल्याचं स्पष्ट केलंय.
जाणून घ्या उत्कृष्ठ खेळाडूची कामगिरी लंडनमध्ये 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीचं सुवर्ण पदक लिमार्दोनी जिंकलं होतं.
1904 मध्ये क्युबाच्या रामोन फोंट्स यांनी तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावलं होतं त्यानंतर लॅटिन अमेरिकी देशांतून हे पदक मिळवणारा लिमार्दो आहे.
हा विक्रम लिमार्दोच्या नावे आहे. व्हेनेझुएलाचे बॉक्सर फ्रान्सिस्को यांनी 44 वर्षांपूर्वी सुवर्ण दक कमावल होतं त्यानंतर सुवर्ण मिळवणारा लिमार्दो हा दुसरा खेळाडू ठरला.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर