Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

IPL 2020 : मुंबई इंडियन्सने बाजी मारली,दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव !

Mhlive24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- IPL 2020 च्या फायनल मध्ये अखेर मुंबई इंडियन्सने बाजी मारली.मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे.

Advertisement

IPL 2020 फायनल जिंकण्यासाठी दिल्ली (Delhi Capitals)ने मुंबई (Mumbai Indians)ला 157 रनचं आव्हान दिलं होत. हे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशताच्या जोरावर मुंबईने अठराव्या ओव्हर मध्येच पूर्ण केले. 

Advertisement

टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या दिल्लीची खराब सुरुवात झाली दिल्लीला पहिल्याच चेंडूवर पहिला झटका लागला. मार्कस स्टोयनिस शून्यावर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेही 2 धावांवर बाद झाला. दमदार कामगिरी करत असलेल्या शिखर धवनने आज निराशा केली. जंयत यादवने धवनला 15 धावांवर बाद केले. त्यामुळे दिल्लीची 22-3 अशी स्थिती झाली.

Advertisement

यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 96 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान ऋषभने आपले अर्धशतक पूर्ण केलं. पंत-अय्यर जोडी सेट झाली. मात्र ही जोडी तोडायला नॅथन कुल्टर नाईलला यश आले.

Advertisement

नॅथनने पंतला हार्दिक पांड्याच्या हाती बाद केलं. पंतने 38 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्सह 56 धावांची तडाखेदार खेळी केली. यानंतर शिमरॉन हेटमायर मैदानात आला. मात्र त्याने फटकेबाजी करण्याआधी ट्रेन्टने त्याला 5 धावावंर माघारी पाठवले. यानंतर कर्णधार श्रेयसने आपले अर्धशतक पूर्ण केलं.

Advertisement

यानंतर अक्षर पटेल मोठा फटका मारण्याच्या नादात 9 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून श्रेयसे अय्यरने 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 65 धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नॅथन कुल्टर नाईलने 2 विकेट्स घेतल्या. तर जयंत यादव आणि 1 विकेट घेतली.पर्पल कॅपच्या शर्यतील असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र एकही विकेट घेता आली नाही.

Advertisement

दिल्लीने दिलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात धडाक्यात झाली. डिकॉक आणि सूर्याने मुंबईला 4.1 ओव्हरमध्येच 45 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. रोहित शर्माने 51 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली.रोहित शर्माच्या Mumbai Indians ने पुन्हा एकदा आपणच आयपीएलचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li