Post office scheme : पोस्टाच्या ‘ह्या’ स्कीममध्ये फक्त 400 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 1 कोटींहून अधिक पैसे

MHLive24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- सध्या अनेकांना गुंतवणूक करायची असते. कोरोनाने गुंतवणूकीचे महत्व सर्वाना पटवून दिले आहे. परंतु अनेकदा गुंतवणूक करताना रिस्क फॅक्टर फार महत्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणी पैसे बुडण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करताना अगदी काळजीपूर्वक सर्व गोष्टी निवडल्या पाहिजेत.(Post office scheme)

तुम्ही असा गुंतवणुकीचा पर्याय निवडा जेथे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुम्हाला ग्यारंटेड परतावाही मिळेल. पोस्ट ऑफिस हा असाच एक सुरक्षित पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथे तुम्हाला अशा योजनेची माहिती दिली जाणार आहे जी तुम्हाला छोट्या गुंतवणुकीत चांगला परतावा देईल. या योजनेत तुम्ही फक्त 400 रुपयांची बचत करून 1 कोटी रुपये घेऊ देऊ शकता. चला जाणून घेऊयात

Advertisement

पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना

तुमच्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक धोरण (PPF) असल्यास तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करावी. ही पोस्ट ऑफिस बचत योजना वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ व्याज देते.

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे, परंतु त्यानंतर तुम्ही तो आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. 15 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्हाला यापुढे पैशांची आवश्यकता नसल्यास, तुम्ही हा फंड पुढे वाढवू शकता. ज्यावर तुम्हाला अधिक चक्रवाढ लाभ मिळेल.

Advertisement

दररोज 400 रुपये गुंतवा

या बचत योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये ठेवता येतात. वर्षातून एकदा 1.50 लाख रुपये जमा करण्याऐवजी, जर तुम्ही मासिक 12500 रुपये गुंतवले किंवा तुम्ही दररोज 400 रुपये गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळेल. तसेच, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही तुमच्या PPF खात्यावर कर सवलत मिळवू शकता.

अशा प्रकारे तुम्हाला 18 लाख व्याजाचा लाभ मिळेल

Advertisement

परिपक्वता कालावधी: 15 वर्षे
मासिक गुंतवणूक: रु 12,500
1 वर्षाची गुंतवणूक: 1.50 लाख रुपये
15 वर्षांत एकूण गुंतवणूक: 22.50 लाख रुपये
वार्षिक व्याज दर: 7.1 टक्के
परिपक्वता रक्कम: रु 40.70 लाख
व्याज लाभ: रु. 18.20 लाख

25 वर्षांच्या गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त परतावा

या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक 12,500 रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षात एकूण 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. जर तुम्ही 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर एकूण जमा रक्कम 37.50 लाख रुपये होईल. ज्यावर तुम्हाला 7.1 टक्के चक्रवाढ व्याज दिले जाईल. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला 1.03 कोटी रुपये मिळतील. ज्यामध्ये व्याजाचा लाभ 62.50 लाख रुपये असेल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker