Satellite Broadband : आता केबल शिवाय घरात येईल थेट आकाशातून येईल इंटरनेट, जाणून घ्या सॅटेलाइट ब्रॉडबँडविषयी सविस्तर…

MHLive24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या महामारीने संपूर्ण जग हैराण झाले आहे. या महामारीने जसे लोकांना आपापल्या घरात कैद केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अगदी कार्यालयीन कामकाजही घरातूनच केले जात आहे.(Satellite Broadband )

आताही अनेक कंपन्यांनी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (WFH) सुविधा दिली आहे. परंतु, अनेक शहरात विशेषतः खेड्यांमध्ये इंटरनेट उपलब्ध होणं नाही. अनेक भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी नाही किंवा ती असली तरी त्याच्या स्पीड संदर्भात मोठी समस्या आहे.

आता थेट आकाशातून इंटरनेट घरात येईल

Advertisement

वर्क फ्रॉम होम कल्चर भविष्यातही चालू राहील असे दिसते. त्यामुळे दूरवरच्या भागात हायस्पीड इंटरनेट नेटवर्कची नितांत गरज आहे.

आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांनी ही संधी ओळखली आणि त्यांनी भारतात स्पेस इंटरनेट आणण्यासाठी एक कंपनी स्थापन केली.

मस्कची भारतीय कंपनी ‘स्टारलिंक इंटरनेट’ देशभरात हायस्पीड इंटरनेट सुविधा देण्याचे आश्वासन देत आहे. कंपनी थेट अंतराळातून ब्रॉडबँड (BFS) सुविधा कशी पुरवणार आहे ते पाहुयात

Advertisement

BFS सर्विस म्हणजे काय?

ब्रॉडबँड फ्रॉम स्पेस (BFS) ही एक वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे जी अंतराळात स्थापित केलेल्या उपग्रह नेटवर्कद्वारे ग्राहकांच्या घरांना किंवा कार्यालयांना हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते.

याला सॅटेलाइट ब्रॉडबँड असेही म्हणतात. हे 300 MB प्रति सेकंद (300mbps) पर्यंत इंटरनेट गती प्रदान करू शकते. तथापि, त्याची सुरुवातीची गती 100mbps असेल.

Advertisement

सॅटेलाइट इंटरनेट कसे कार्य करते ?

सॅटेलाइट इंटरनेट किंवा BFS जिओ स्टेशनरी (GEO) किंवा लो-अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह वापरते. जिओ म्हणजे अवकाशात स्थापित केलेला उपग्रह तर LEO म्हणजे पृथ्वीच्या कमी कक्षेत स्थापित केलेला उपग्रह.

तथापि, उपग्रह नेटवर्क ऑपरेशनचे केंद्र म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रात स्थापित केलेले अर्थ स्टेशन गेटवे असते. हा गेटवे उपग्रह नेटवर्कला नेटशी जोडतो. येथून डेटा प्राप्त करण्यासाठी, ग्राहकाला वापरकर्ता प्रवेश टर्मिनल (UT) डिव्हाइस आणि सॅटेलाइट नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी अँटेना आवश्यक आहे.

Advertisement

BFS समोरील आव्हाने

सॅटेलाइट ब्रॉडबँड आणि सेवेची किंमत सध्या सुमारे $20 किंवा सुमारे 1,500 रुपये प्रति जीबी आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सॅटकॉम कंपन्या परदेशी उपग्रह क्षमता थेट भाड्याने देऊ शकत नाहीत. त्यांना यासाठी DoS चा सहारा घ्यावा लागेल, जेणेकरून खर्च जागतिक सरासरी दराच्या 10 पट पोहोचेल.

जर सरकारी धोरणांशी संबंधित समस्या दूर केल्या आणि UT उपकरणांची किंमत कमी केली तर ब्रॉडबँडचा दर 100 रुपये प्रति जीबीपर्यंत येऊ शकतो. सध्या UT ची किंमत सुमारे $1,000 किंवा सुमारे 75,000 रुपये आहे. सॅटेलाइट नेटवर्कपेक्षा इंटरनेट स्वस्त मिळावे यासाठी LEO सॅटेलाइटचे नवीन प्रगत तंत्रज्ञान आणावे लागेल. तसेच, ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची आवश्यकता असेल.

Advertisement

कोण-कोणत्या कंपन्या प्रयत्न करत आहेत?

Bharti Airtel समर्थित OneWeb, Elon Musk’s SpaceX, Canadian कंपनी Telesat आणि Amazon’s Project Quiper यांसारख्या कंपन्या भारतात सॅटेलाइट नेटवर्क पुरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्या विद्यमान दूरसंचार कंपन्या आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांशी व्यवहार करतील. अमेरिकन कंपनी ह्यूजेस भारतातील जिओ सॅटेलाइट मार्केटमध्ये 50 करोड़ डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker